HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांच्या आग्रहामुळे परमबीर सिंग यांची पदावरुन उचलबांगडी?

मुंबई | उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर ठेवण्यात आलेल्या स्फोटकांचे आणखी काही धक्के मुंबई पोलिसांमध्ये बसले आहेत. राज्याच्या पोलिस दलात मोठा बदल करण्यात आला आहे. हेमंत नगराळे होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त असतील. तररजनीश सेठ नवे पोलिस महासंचालक झाले आहेत. संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे. आणि महत्वाचं म्हणजे परमबीर सिंग यांच्याकडे गृह रक्षक दलाची जवाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान, सचिन वाझे प्रकरणावरुन २ दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या बैठका सुरुच आहेत. तसेच, २ दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट झाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या या बैठकीत शरद पवार यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंह यांना दूर करण्याचा आग्रह धरल्याची माहिती समोर आली होती.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर ठेवण्यात आलेल्या स्फोटके प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना अटक केली आहे. आता डॅमेज कंट्रोलसाठी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना आयुक्तपदावरून हटवणे अटळ होते. त्यांच्या जागी आता हेमंत नागराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

झारखंड सरकार पाडण्यात आपला हात नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण

News Desk

‘त्या’ विधानावर दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण….!

News Desk

मलिक झाले बिनखात्याचे मंत्री; ‘या’ मंत्र्यांकडे सोपविली अल्पसंख्याक खात्याची जबाबदारी

Aprna