HW News Marathi
देश / विदेश

शेअर बाजारात सेन्सेक्सने पहिल्यांदाच ओलांडला ६२०००चा टप्पा, या शेअर्समध्ये जोरदार वाढ

मुंबई | दिवाळीच्या तोंडावर शेअर बाजाराने उसळी घेतल्याने आता मार्केटमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे. शेअर बाजार आज पुन्हा एका नवीन उच्चांकासह उघडला आहे, ज्यामुळे आणखी एक इतिहास निर्माण झाला. बीएसईचा 30-स्टॉकचा निर्देशांक सेन्सेक्स ३९०.८९ अंकांसह ६२,१५६.४८ वर उघडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील १८,६०२.३५ च्या नवीन विक्रमासह व्यापार सुरु झाला आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २८९.१७ अंकांच्या वाढीसह ६२,०५४.७६ वर होता, तर निफ्टी ८०.५५ अंकांच्या वाढीसह १८,५५७.६० वर होता.

आयआरसीटीसीच्या शेअरमध्ये मजबूत तेजीचा कल आजही कायम

एनएसइवर आज तो ६१४०.३० रुपयांवर उघडला आणि सकाळी ९.३० पर्यंत ६३३४ च्या पातळीला स्पर्श केला. एल अँड टी, विप्रो, भारती एअरटेल, टेक महिंद्रा आणि बजाज फिनसर्व सुरुवातीच्या व्यापारात निफ्टीच्या सर्वाधिक लाभधारकांच्या यादीत होते. आयटीसी, एस्कॉर्ट्स मोटर्स, अल्ट्राटेक, आयओसी आणि टाइट सारखे स्टॉकमध्ये कोणतीही वाढ दिसून आली नाही.आयआरसीटीसीच्या शेअरमध्ये मजबूत तेजीचा कल आजही कायम आहे. गेल्या ५ सत्रांमध्ये तो सुमारे ३० टक्क्यांनी वाढून ६२८४ रुपयांवर पोहोचला आहे. सलग सातव्या ट्रेडिंग सत्रात सोमवारी शेअर बाजारात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १२.४९ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.

बीएसईचा ३०-शेअरचा सेन्सेक्स ४५९.६४ अंकानी म्हणजे ०.७५ टक्क्यांनी वाढून ६१,७६५.५९ अंकांच्या नवीन विक्रमी उच्चांकावर बंद झाला. ट्रेडिंग दरम्यान, ६१,९६३.०७ गुणांवर गेला. गेल्या सात ट्रेडिंग सत्रांमध्ये सेन्सेक्सने २,५७५.८६ अंकांनी म्हणजेच ४.३५ टक्क्यांनी वाढला आहे. बाजारात या तेजीमुळे, बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १२,४९,०५९.८८ कोटी रुपयांनी वाढून केवळ सात ट्रेडिंग सत्रांमध्ये २,७४,६९,६०६.९३ कोटी रुपयांवर गेला.एल अँड टी चा शेअर ट्रेडिंगच्या सुरुवातीला ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला. सध्या हा शेअर ६,६८० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. कंपनी आज तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करेल, ज्यामध्ये कंपनीचा नफा निश्चित असल्याचे मानले जाते.

दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा ११.१ टक्क्यांनी वाढून ५५१.७ कोटी रुपये झाला. तसेच, तिमाही निकालांच्या आधारावर, कंपनीच्या महसुलात ८.८ टक्के वाढ नोंदवली गेली आणि ती ३,४६२५ कोटी वरून ३,७६७ कोटी झाली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिलीगुडी येथे फोम कारखान्याला आग

News Desk

बुर्ज खलिफा या इमारतीत भारद्वाज बंधुंचा फ्लॅट

News Desk

VLC Media Player भारतात बंदी, वेबसाइट आणि VLC डाउनलोड लिंक ब्लॉक

News Desk