HW News Marathi
महाराष्ट्र

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंची आज ईडी चौकशी होणार


पुणे। पुण्यातील भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंची आज ईडी चौकशी होणार आहे. १० वाजता त्यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास बजावण्यात आलं आहे.खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला होता. मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं.

खडसेंचे भोसरी जमीन प्रकरण नेमकं काय?

पुणे शहरालगत भोसरी एमआयडीसीत ही जमीन खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने खरेदी केली होती. या जमीन व्यवहारात खडसेंनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. कोट्यवधींची जमीन अगदी कवडीमोल भावात खरेदी करण्यात मोठा गैरव्यवहार झाल्याची फिर्यादही याप्रकरणी नोंदविण्यात आली होती. ही भोसरीतील जमिनीची किंमत सुमारे ४० कोटी रुपये असताना ती केवळ ३.७५ कोटी रुपयांना खडसे यांच्या कुटुंबियांना विकण्यात आल्याचा आरोप केला होता. न्या. झोटिंग समितीने या प्रकरणाची चौकशी केली, सोबतच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने चौकशी करून खडसेंना क्लीन चीट दिली होती. झोटिंग समितीचा अहवाल खडसेंनी वारंवार मागणी करूनही जाहीर झाला नव्हता. यानंतर ईडीने मनीलाँडरींग प्रकरणी गेल्या आठवड्यात एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांची पाच कोटी ७३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली. सध्या या जमीन घोटाळ्याप्रकरणी खडसे यांची चौकशी सुरु आहे. खडसेंनी फडणवीस सरकारमधून याच प्रकरणावरून जून २०१६ला राजीनामा दिला. मात्र पाच वर्षानंतरही हे प्रकरण त्यांची पाठ सोडत नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नांदेड : कुसूमताई चव्हाण महिला भूषण पुरस्कार जाहिर

News Desk

मराठा आंदोलकांसाठी दिवाकर रावतेंनी मोठी घोषणा

swarit

हताश, थकलेल्या लोकांची देशाला गरज नाही !

News Desk