HW News Marathi
महाराष्ट्र

“शिंदेंनी निवडणूक गांभीर्यानं घेणं अपेक्षित होतं!” – शरद पवार

मुंबई | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला आहे. शिंदेंनी निवडणूक हवी तेवढी गांभीर्यांनी घेतली नाही, निवडणूक गांभीर्यांने घेणे अपेक्षित होते, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला. पवार हे आज (२४ नोव्हेंबर) साताऱ्यातील महाबळेश्वर येथे पत्रकारांशी बोलत होते.

बँकेच्या निवडणुकीत शिंदेच्या पराभवासंदर्भात पत्रकारांनी विचरल्यावर पवार म्हणाले, “शिंदेंनी निवडणूक हवी तेवढी गांभीर्यांनी घेतली नाही, निवडणूक गांभीर्यांने घेणे अपेक्षित होते. तसे न केल्यामुळे पराभव झाला. सरकारी संस्थाच्या निवडणुकामध्ये पक्ष घेत नाही, असे देखील पवार म्हणालं. विधानसभेनंतर शिंदेंचा हा दुसरा पराभव झाला. शिंदेच्या पराभवानंतर त्यांच्या समर्थकांनी साताऱ्यातील पक्षाच्या कार्यालायावर दगडफेक केली असून पक्षाविरोधात घोषणाबाजी देखील केल्या होते.

अन्य मंडळांचे देखील विलीनीकरण करावे लागेल

“एसटी महामंडळाची स्थिती वाईट आहे. यापूर्वी कधी एसटी महामंडळाला सरकारच्या मदतीची गरज भासली नव्हती. एसटीसंदर्भात सर्व सामान्यांचे मत महत्त्वाचे आहे. तसेच एसटीचे विलीनीकरण केल्यावर अन्य मंडळाचं देखील विलीनीकरण करणाची मागणी करतील,” असे पवार म्हटले. “विलिनीकरणाची मागणी केली जात आहे. विलीनीकरणाचा न्यायालयात असल्याने त्यावर मी काही बोलणार नाही,” असेही पवार म्हणालं.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृषी कायदे मागे

कृषी कायदे मागे घेतल्यामुळे जर नुकसान झाले असेल, तर मग ते का मागे घेतले ?, असा सवाल उपस्थित करत केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली. कृषी कायदे हा राज्याचा प्रश्न होता. केंद्र सरकारने राज्याच्या सरकारला विश्वासात घेतले नाही. शेतकऱ्यांच्याबाबत धोरण ठरवताना त्यांच्याशी चर्चा सदनात होत नाही, असे पवार म्हणाले. पवार पुढे म्हटले की, काही शेजारच्या राज्यात निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशा शब्दात केंद्र सरकारवर टीका केली.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंदोरीकर महाराजांना पुत्र प्राप्तीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी ७ ऑगस्टला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

News Desk

पारस येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींची गिरीष महाजन यांनी केली चौकशी

Aprna

गुरुपौर्णमेनिमित्त पंकजा मुंडे यांनी त्यांच्या गुरूंचे केले स्मरण

News Desk