HW News Marathi
महाराष्ट्र

साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळावर अध्यक्षपदी राष्ट्रवादीचा युवा आमदार

शिर्डी। अनेक भाविकांच श्रद्धास्थान असलेल्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदाची आता निवड करण्यात आली असून राष्ट्रवादीच्या युवा आमदाराची आता वर्णी लागली आहे. अहमदनगरमधील राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या माजी आमदाराची नियुक्ती साईबाबा संस्थानावर करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी सहा, तर शिवसेनेचे पाच सदस्य असतील. तर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानची जबाबदारी आता काँग्रेसच्या खांद्यावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कोण असणार यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत गेल्या काही दिवसांपासून चढाओढ सुरु असलेली पाहायला मिळाली होती, तर दुसरीकडे मुंबईच्या सिद्धीविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद शिवसेनेकडे गेल्याने शिर्डीच्या साईबाबा संस्थान अध्यक्षपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी सुरु होत्या. अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार असल्यामुळे विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादीने दावा केला होता.

शिर्डीच्या साईबाबा संस्थान अध्यक्षपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी सुरु होत्या. अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार असल्यामुळे विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादीने दावा केला होता.

शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या युवा आमदाराची वर्णी लागली आहे. अहमदनगरमधील राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या माजी आमदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी सहा, तर शिवसेनेचे पाच सदस्य असतील. तर पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाची धुरा काँग्रेसच्या खांद्यावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कोण असणार यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु होती. मुंबईच्या सिद्धीविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद शिवसेनेकडे गेल्याने शिर्डीच्या साईबाबा संस्थान अध्यक्षपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी सुरु होत्या. अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार असल्यामुळे विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादीने दावा केला होता.

साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळात अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्याशिवाय १५ सदस्य असतात तर २००४ पासून साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. या मंडळावर दर तीन वर्षांनी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडत असते.आशुतोष काळे हे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगा राष्ट्रवादीचे आमदार आहेत. माजी आमदार अशोकराव काळे यांचे ते पुत्र, तर माजी खासदार शंकरराव काळे यांचे ते नातू. त्यांच्याकडे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्याही अध्यक्षपदाची धुरा आहे. आता ३५ वर्षीय आमदार आशुतोष काळे यांची शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

शिर्डी संस्थानचा वाद

साई भाविक देशा-विदेशात पोहचले असताना भारतीय पोषाखातच शिर्डीत दर्शनासाठी यावे अशा फलकानं उपस्थित झालेला वाद, तर २५ हजार भरा आणि काकड आरती करा, दर्शनावरून शिर्डी ग्रामस्थ आणि बगाटे यांच्यात झालेला वाद अशा अनेक प्रसंगी शिर्डी संस्थान वादाच्या कचाट्यात सापडलंय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘…तर व्यक्त करणाऱ्या जमातीने’, मराठी माणसाच्या पराभवानंतर पेढे वाटले, राऊतांची भाजपवर टीका!

News Desk

देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खास शुभेच्छा!

News Desk

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राजू शेट्टींचा ‘आक्रोश मोर्चा’!

Jui Jadhav