HW News Marathi
महाराष्ट्र

“शिवसैनिक मरायला आणि मारायला तयार”, राऊतांचा राणा दाम्पत्यांना इशारा

मुंबई। आमच्या घरात घुसण्याचा कोणी प्रयत्न केला तर शिवसैनिक स्वतः रक्षण करण्यासाठी समर्थ आहे. शिवसैनिक मरायला आणि मारायला तयार आहेत, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे. राऊतांनी आज(२३ एप्रिल) नागपूर मधून माध्यामांशी बोलताना दिला आहे.

राणा दाम्पत्य यांचे मातोश्री हनुमान चालिसा पठाणवर बोलताना राऊत म्हणाले, “या घटनेकडे एक शिवसैनिक म्हणून जसे पाहायला हवे, तसे पाहिले तर कोणाच्या तरी पाठबळाने तुम्ही मातोश्रीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असतात तर शांत बसणार नाही. आणि कायदा सुव्यवस्था आम्हाला सांगू नका. मुख्यमंत्र्यांनी काय केले पाहिजे हे ऐकण्याऐवढे आम्ही भिकारी नाहीनाही. “

“तुम्ही लक्ष्मण रेषा ओलांडली तर शिवसैनिक सुद्धा तुमच्या घरापर्यंत घुसणाचा अधिकार आहे. राज्या राष्ट्रपती राजवट लागू होईल, ईडीच्या धमक्या आम्हाला देऊ नका, यावेळी शिवसैनिकांवर कोणाचे नियंत्रण नाही. अजून मुंबईत सुरूवात झालेली नाही. मुंबई गेल्या दोन दिवस ज्या घटना घडल्या त्याचा विस्फोट आहे. तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा तुम्हला ही घरे आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा, “राऊतांनी धमकी वजा इशारा दिला आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपची ऑफर न स्वीकारण्याइतके शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत – चंद्रकांत पाटील

News Desk

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ‘हे’ निर्णय घेण्यात आले

swarit

मुख्यमंत्र्यांना विधान भवनात राज ठाकरे भेटणार होते पण ‘या’ कारणाने भेट टळली 

News Desk