HW Marathi
महाराष्ट्र राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

#MaharashtraElections2019 : महायुती आणि महाआघाडीला बंडखोरांचे मोठे आव्हान

मुंबई | राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (२१ ऑक्टोबर) मतदान पार पडले. यानंतर आता राज्याच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. राज्याच्या एक्झिट पोल्सनुसार भाजप-शिवसेना महायुतीला कौल दिला आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला विरोधी पक्ष म्हणून समानधान मानावे लागणार आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत पक्षाने तिकीट न मिळाल्यामुळे पक्षासोबत बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवणाऱ्याचे आवाहन महायुती आणि महाआघाडीला मोठी डोके दुखी  असणार आहे.

बार्शीत शिवसेना विरुद्ध शिवसेना

बार्शी विधानसभा मतदारसंघात परंपरेप्रमाणे दिलीप सोपल यांनी निवडणुकीच्या वेळी वेगवेगळ्या चिन्हावर लढण्याची परंपरा कायम ठेवली असून त्यांनी राष्ट्रवादी सोडत शिवसेनेत प्रवेश केला आहे. कॉंग्रेस–राष्ट्रवादी महाआघाडीलामधून नवख्या निरंजन भूमकर यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, सोपल यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेतील राजेंद्र राऊत यांनी पक्षांसोबत बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उरले आहे. त्यामुळे सोपल यांना राष्ट्रवादींच्या भूमकर यांचे आवाहन नसून शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्या राऊत यांचे मोठे आवाहन आहे. यामुळे बार्शीत राष्ट्रवादी विरोद्ध शिवसेना अशी लढत लोकांना वाट होती. मात्र, बार्शी मतदारसंघात खरी लढत ही शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे.

माण-खटावमध्ये बंधू विरुद्ध अपक्ष

माण – खटाव मतदारसंघात शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करत उमेदवारी मिळाली. तर दुसऱ्या बाजुला काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करत त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. हे दोघेही सख्खे भाऊ एकएमेंकांच्या विरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादीने उमेदवार दिला नाही मात्र राष्ट्रवादीचे सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी अपक्ष फॉर्म भरला आहे.

तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी

वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळालेल्या नाराज असलेल्या तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या बंडखोरीमुळे शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार तृप्ती सावंत यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून हे वृत्त देण्यात आले. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून तृप्ती सावंत यांना उमेदवारी नाकारत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी उमेदवारी देण्यात आली. विद्यमान आमदार असूनही त्यांना उमेदवारी डावलल्याने तृप्ती सावंत नाराज होत्या.

राष्ट्रवादीराष्ट्रवादी पृरस्कृत अपक्ष उमेदवार आणि शिवसेनेच्या बंडखोरांमध्ये चुरशेची लढत

सोलापुरातल्या  करमाळाविधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या रश्मी बागल, अपक्ष नारायण पाटील व संजयमामा शिंदे यांच्यातच चुरशीचा लढत पाहायला मिळणार आहे. मात्र, नुकताच राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या रश्मी बागल यांना सेनेने तिकीट दिलेय. त्यामुळे नारायण पाटील नाराज आहेत. २०१४ साली नारायण पाटील हे शिवसेनेच्या तिकिटावर जिंकले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शामल बागल यांचा पराभव केला होता. तसेच या मतदारसंघात अपक्ष म्हणून उभे असलेले संजय शिंदे यांना त्यांच्या सफरचंद निवडणूक लढविणार आहे. तर शिंदे यांना सफरचंद चिन्हासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. संजय शिंदे हेच करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुरस्कृत उमेदवार असतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील पत्रकार परिषद घेऊन दिली.

कागलमध्ये तिरंगी लढत

भाजपच्या समरजित सिंह घाटगे यांनी आधी थेट स्वत:च्या उमेदवारीची घोषणा करत कागल शहरामधून रॅली काढली होती. कागल शहरात समरजित यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनही केले. मात्र, युतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला असल्याने त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळू शकली नाही. यामुळे विधानसभा निवडणुकीत समरजितसिंह हे कागल विधानसभा मतदारसंघातील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला. यामुळे कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसेचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ आणि शिवसेना-भाजप महायुतीचे  संजय घाटगे यांना या दोघांना समरजित सिंह घाटगे यांचे मोठे आव्हान असणार आहे.

शिवसेनेशी एकनिष्ठ असूनही पक्षाविरोद्धा निवडूक लढविली

बुलडाण्यात शिवसेनेचे संजय गायकवाड यांना उमेदवारी दिल्यानंतर माजी आमदार विजयराज शिंदे हे बंडखोरीच्या पवित्र्या घेत अपक्ष निवडणूक लढविण्याचे निश्चिच केला. मुंबईवरून परत आल्यानंतर शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी समर्थकांची एक बैठक घेऊन अपक्ष उमेदवारी दाखल करणार असल्याची घोषणाच केली. त्यामुळे बुलडाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. तब्बल ३५ वर्षे शिवसेनेशी एकनिष्ठ राहलेलो असताना सातत्याने आपणास स्थानिक पातळीवर अपमानीत करण्यात आले.

 

Related posts

महाराष्ट्रातील ‘या’ बहुचर्चित चेहऱ्यांचे भविष्य आज होणार सीलबंद

News Desk

काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांचा कार्यकर्तांचा संकल्प मेळावा, भाजप प्रवेशाची दिशा ठरविणार

News Desk

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पंतप्रधान मोदींना विकली !

News Desk