मुंबई | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १ किंवा २ नोव्हेंबरला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. शहांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान शिवसेना-भाजप युतीचा फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचा मुहूर्त ३ नोव्हेंबरनंतरच ठरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. “पुढील ५ वर्ष मीच मुख्यमंत्री पदावर राहणार,” असे धक्कादायक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये वक्तव्य केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत
यावर शिवसेवा खासदार संजय राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांनी फणा काढून बोलण्याची गरज नाही,” अशी टीका त्यांनी केली आहे. यानंतर राऊत यांनी आज (२९ ऑक्टोबर) ५०-५० फॉर्म्युला हा लोकसभेवेळीच ठरला असल्याचा दावा, राऊतांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्रीपद हा शिवसेनेचा हक्क, असे म्हणत त्यांनी भाजपला धमकी वजा इशारा दिला आहे. शिवसेना-भाजप यांच्या युतींच्या मुद्द्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अद्याप कोणतेही प्रतिक्रिया आली नाही, मात्र, उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“सत्ता, पद आणि जबाबदाऱ्यांचे समान वाटप होईल, असा शब्द मुख्यमंत्री स्वतः दिला होता.’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी ५०-५० फॉर्म्युला ठरला असल्याचा सांगतानाचा व्हिडिओ दाखवून राऊतांनी मुख्यमंत्र्यांच्यां विधानांची आठवण करून दिली. तसेच मुख्यमंत्र्यांचा हा व्हिडिओ लोकसभा निवडणुकांपूर्वी म्हणजेच १८ फेब्रुवारी २०१९ रोजी युतीची घोषणा करतानाचा हा देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.