HW News Marathi
महाराष्ट्र

बीडच्या स्थानिक आमदारामुळे अजित पवारांच्या उद्घाटन कार्यक्रमाला शिवसेनेचा विरोध

बीड | बीडमध्ये विकास कामाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालीये. आज बीडमध्ये शंभर कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या विकास कामाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला मंत्री धनंजय मुंडे यांची विशेष उपस्थिती होती. मात्र हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच बीडमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर हे आम्ही आणलेल्या कामावर डल्ला मारत आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी विशेष कामं म्हणून या कामांना मंजुरी दिली आहे. मात्र स्थानिक आमदार हे काम करताना आडकाठी आणत असल्याचा आरोपही यावेळी शिवसैनिकांनी केला. याच मुद्यावरून शिवसैनिक आज (८ फेब्रुवारी) बीडमध्ये रस्त्यावर उतरल्याचे पहावयास मिळाले त्यांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच प्रचंड घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवून या विकास कामाच्या उद्घाटन सोहळ्याचा निषेध नोंदवला आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवून, अजित दादा तुमच्या राष्ट्रवादीच्या आमदाराला आघाडीचा धर्म शिकवा, असं म्हणत बॅनर आणि घोषणाबाजी करण्यात आलीय. यावेळी काळे झेंडे घेऊन हे शिवसैनिक रस्त्यावर आले आहेत.महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादी विकास कामाच्या उद्घाटनावरून आक्रमक झाल्याचे पहावयास मिळाले. तर कार्यक्रमाच्या ब्यांनर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा फोटो लावण्यात आला नाही तर व्यासपीठावर एकही शिवसैनिनी हजेरी लावली नाही.

बीड शहरातील शंभर कोटी पेक्षा जास्त विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमापूर्वी मात्र शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत स्थानिक राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षिरसागर हे शिवसैनिकांना काम करू देत नाहीत. शिवसैनिकांनी आणलेल्या कामाचे उद्घाटन परस्पर आमदार करत आहेत. असा आरोप शिवसैनिकांनी केलाय. तर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मात्र याबाबद मध्यमानी विचारणा केली असता म्हणले की, आम्ही शिवसेनेच्या पद्धधिकाऱ्यांना कार्यक्रमास आमंत्रण दिले होते मात्र ते आले नाहीत तर ब्यांनर वर शिवसेनेच्या एकाही पदाधिकाऱ्यांचा फोटो लावला का नाही असे विचारले असता धनंजय मुंडे म्हणाले की, चुकून लावला गेला नसेल. एकंदर पाहता बीड मध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी हा वाद नेमक्या कोणत्या टोकाला जातो हे येणारा काळच दाखवेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘महाराष्ट्राचं किती कौतुक व्हायला हवं याचा विचार करतोय’ जयंत पाटलांचा मोदींना टोला!

News Desk

बाप्पा पावला! गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांना खुशखबर; रावसाहेब दानवेंनी मोठी घोषणा

News Desk

प्रजासत्ताक दिनी राज्यभरात ‘या’ वेळी शासकीय ध्वजारोहण होणार

Aprna