HW News Marathi
महाराष्ट्र

एक देश एक निवडणूक भारतात अशक्य | राऊत

मुंंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘एक देश एक निवडणूक’ ही संकल्पना अंमलात आणण्यासाठी नुकतीच सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. परंतु या बैठकीला विरोधकांनी पाठ फिरवल्याचे लक्षात आले त्यानंतर आता मित्र पक्ष शिवसेनेनेही विरोधकांच्या सुरासुर मिसळ नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक देश एक निवडणूक ही संकल्पना अंमलात आणणे अश्क्य असल्याचे म्हटले आहे.

एक देश, एकाचवेळी निवडणूक या संकल्पनेवर चर्चा होण्याची गरज तर आहे. मात्र भारतासारख्या मोठ्या देशात एका मताने सरकार तयार होते किंवा ते पाडले. मात्र अशा स्थितीत एक देश, एकाचवेळी निवडणूक शक्य असेल का? जर सरकार पडले, तर त्या ठिकाणी तीन वर्षांसाठी राष्ट्रपती राजवट राहू शकत नाही. या संकल्पनेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि त्यावर चर्चा होण्याची गरज असे स्पष्ट मत राऊत म्हणाले.

तसेच मोदींच्या या संकल्पनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र लिहले. या पत्रात पवार यांनी मोदींची संकल्पना चांगली आहे.अशी दाद दिली, मात्र ती प्रत्यक्षात आमलात आणणे अवघड असल्आयाचे त्हेयांनी पत्रातून म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्ताधारी पक्षाने किंवा विरोधी पक्षाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन आरक्षणासंदर्भात एकदिलाने काम करावे – छत्रपती संभाजीराजे

News Desk

“माझी शिकवण आहे, त्यानुसार आदेश काढला,” पोलिस आयुक्तांचं देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

News Desk

संभाव्य पुरस्थितीती लक्षात घेता सांगली महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सक्रिय

News Desk