HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेच्या आमदारांची ‘मातोश्री’वर बैठक, सत्तास्थापनेबाबत उद्धव ठाकरे साधणार संवाद

मुंबई | राज्यात महाविकासआघाडीचे सरकार येण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई आज काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची बैठक होणार आहे. या बैठकीत महाविकासआघाडीची औपचारिक घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (२२ नोव्हेंबर) मातोश्रीवर त्यांच्या आमदारांची बैठक बोलविली आहे. या बैठकी उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

या बैठकीला येण्यासाठी शिवसेनेकडून त्यांच्या आमदारांना पाच दिवसाचे कपडे, ओळखपत्र घेऊन येण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. महाविकासआघाडीच्या सत्ता स्थापनेच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असून शिवसेनेच्या आमदारांना कोणी फोडून नये, याची खबदारी म्हणून या सर्व आमदारांनी पुन्हा एकदा हॉटेलमध्ये ठेवण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

तसेच मुख्यमंत्रिपदी शिवसैनिक विराजमान होणार, असा पुनरुच्चार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केला आहे. येत्या २ दिवसात अंतिम निर्णय होईल, असा दावा देखील राऊतांनी यावेळी केला आहे. पुढील पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री, असे ठाम विश्वास राऊत यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चित्रा वाघ यांच्या विरोधात अश्लिल पोस्ट टाकणाऱ्या एकास अटक, दुसरा पसार

News Desk

भाजपचे नितीन पाटील शिवसेनेत,औरंगाबादमध्ये कसा फायदा होणार ?

News Desk

पाच महिन्यांत १९ हजार ५५३ तरूणी, महिला बेपत्ता

Sanjay Jog