HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी घेतली बाळासाहेब थोरात भेट, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच नाराजी दूर ?

मुंबई | शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार अनिल देसाई यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची काल (१७ जून) भेट घेतली आहे. बाळासाहेब थोरात यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी अनिल देसाई यांनी जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

काँग्रेसच्या नेत्यांना निर्णय प्रकियेत सहभागी करून घेतले जात नाही, असे म्हणणे काही दिवसांपूर्वी थोरात मांडले होते. त्यामुळे काँग्रेस नेते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळा रंगल्या आहेत. काँग्रेस बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मात्र, काही कारणास्तव मुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात यांची भेट अद्याप झालेली नाही. या पार्श्वभूमीवर अनिल देसाई यांनी काल बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. यावेळी बाळासाहेब थोरात यांची संपूर्ण बाजू अनिल देसाई यांनी ऐकूण घेतली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळाला ‘भ्रष्टाचारी‘ महाविकास आघाडी सरकारच जबाबदार” – अतुल भातखळकर

News Desk

भीमा नदीवर एक टीएमसी साठवण क्षमतेचे बॅरेजेस बांधण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Aprna

आज एका महिलेने सरकारला पराभूत केले आहे, फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

News Desk