HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार !

मुंबई | विधानसभा निवडणुकीचा निकाल लागूनही राज्यात सरकार स्थापन झाले नाही. शिवसेनेने थेट मुख्यमंत्रीपदावरचे दावा ठोकला आहे. तर भाजप मुख्यमंत्रिपदासह महत्वाची खाती शिवसेनेला सोडण्यास तयार नाही. त्यामुळे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही सरकार स्थापनेचा मुहुर्त लांबणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येते आहे. “मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, हे लिहून घ्या. शिवसेनेने मनावर घेतले, तर स्थिर सरकारसाठी शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते , ” असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (१ नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले

शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच तर तसे घडणारच, ठरवले तर मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असा सूर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आवळला आहे. राऊत पुढे म्हणाले की, ज्यांच्याकडे बहुमत नाही, त्यांनी धाडस करु नये, असा आव्हान राऊत भाजपला दिले.

महाराष्ट्राच्या जनतेला वाटते की शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा. जो ५०-५०चा फॉर्म्युला जनतेसमोर ठरला आहे. त्या फॉर्म्युल्यानुसारच काम झाले पाहिजे. भाजप आणि सेनेने एकत्र येऊन सरकार चालवावे, असा जनतेने कौल दिला आहे. अहंकार हा भल्याभल्यांना घेऊन बुडतो असे ट्वीट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. इतिहासातून सर्वांनीच शिकायला हवं, असा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला आहे. “साहिब…मत पालिए, अहंकार को इतना,..वक़्त के सागर में कईं, सिकन्दर डूब गए..!,” असे ट्वीट करत राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला रामराम, लवकरच करणार भाजपमध्ये प्रवेश

News Desk

“मी येणारच काही जमेना म्हणून अस्वस्थ”- शरद पवार

News Desk

मदन शर्मा यांची राष्ट्रपती राजवट लागू करण्याची राज्यपालांकडे मागणी 

News Desk