HW News Marathi
महाराष्ट्र

माजी वनमंत्र्यांच्या मुलीच्या लग्नात साडेनऊ कोटीचे कार्पेट; राऊतांचा मुनगंटीवारवर आरोप

मुंबई | “माजी वनमंत्र्यांच्या मुलीच्या लग्नात जंगलाचा सेट उभारण्यात आला होता. जंगलाचा फील येण्यासाठी जे कारपेट टाकले होते, त्या कार्पेटची किंमत साडेनऊ कोटी रुपये होती. हे ईडीला दिसले नाही का?,” असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीला केला आहे. यातून राऊतांनी शिवसेना भवनात आज (१५ फेब्रुवारी) आयोजित पत्रकार परिषदेतून ईडी आणि भाजपवर टीका केली. यावेळी राऊतांनी भाजपचे खाससदार किरीट सोमय्या यांचा उल्लेख हा दलाल म्हणून केला आहे.

राऊत म्हणाले, “माझ्या मुलीच्या लग्न सोहळ्यात खर्चाचा ईडी हिशेब करत आहे. यासाठी ईडीचे अधिकारी फुलवाले, पताकावाले, मेहेंदीवाले, नेलपॉलिश करणारे यांच्याकडे जावून मी किती पैसे दिले, याची चौकशी ईडी करत आहे. हे सर्व ईडीचे काम आहे का?, फडणवीस सरकाच्या काळात माजी वनमंत्र्यांच्या मुलीच्या लग्नात जंगलाचा सेट उभारण्यात आला होता. जंगलाचा फील येण्यासाठी जे कार्पेट टाकले होते, त्या कारपेटची किंमत साडेनऊ कोटी रुपये होती. हे ईडीला दिसले नाही का?,” असा सवाल त्यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. 

खोटे बोलायचे पण रेटून बोलयाचे – मुनगंटीवार

राऊतांच्या आरोपावर माजी वनमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “राऊतांनी कार्पेटची चौकशी केलेली आहे. याचा सरकारडे अहवाल देखील आहे. आपल्यावर आरोप झाल्यानंतर खोटे बोलायचे पण रेटून बोलयाचे हे काही योग्य नाही. आम्ही राऊतांसारखी पत्रकार परिषद घेऊन कधी आरोप केलेले नाही, असे म्हणत त्यांनी राऊतांवर टीका केली.

दलाल’ ‘भडवा’ XXX- संजय राऊतांकडून सोमय्यांचा उल्लेल – राऊत

राऊतांनी दलाल’ ‘भडवा’ XXX- संजय राऊतांकडून किरीट सोमय्यांचा वादग्रस्त उल्लेख केला आहे. माझं ‘त्या दलाला’ आव्हान, आपण सगळे ४ बसेस करू आणि आपण ‘त्या’ १९ बंगल्यांमध्ये पिकनिकला जाऊ, आणि जर तुम्हाला ते १९ बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन, आणि जर दिसले नाहीत तर त्या दलाला जोड्याने मारू”, असे ते पत्रकार परिषदेत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उद्धव ठाकरेंची महाविकासआघाडीत घुसमट होतेय, आज ना उद्या ते बाहेर पडतील”, संजय काकडेंचं मोठ विधान

News Desk

‘केंद्रसरकारकडून महाराष्ट्राला लसपुरवठा होत नसल्याने लसीकरणाची केंद्रे बंद करावी लागतायत’ – नवाब मलिक

News Desk

आज दिवसभरात राज्यात ८ हजार १५९ नविन कोरोनाबधित रुग्ण!

News Desk