मुंबई | “कितीही प्रयत्न करा पण आम्ही भाजपला पुरून उरू,” असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला धमकी वजा इशारा दिला आहे. राऊत पुढे म्हणाले की, विश्वासदर्शक ठरावावेळी भाजपपेक्षा १० जागा आम्हाला जास्त मिळतील आणि बहुमत सिद्ध करू, असा विश्वास त्यांनी आज (२५ नोव्हेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले आहे.
Sanjay Raut, Shiv Sena: There are four people in 'Operation Kamal'; CBI, ED, Income Tax dept and Police carry out 'Operation Kamal'. But it will not yield any result here. If you have the majority then why do you need an 'Operation Kamal'? #Maharashtra https://t.co/KLZbqNncdx
— ANI (@ANI) November 25, 2019
आमदारांची सह्या आणि फोटोंसह सगळी कागदपत्रे असल्यामुळे सरकार हे महाविकासआघाडीचेच येणार असल्याचा दावा राऊतांनी केला आहे. “आमचे सरकार स्थापन झाल्यावर आमचा आरोग्यमंत्री झाल्यावर आम्ही वेड्यांची इस्पितळे उभारू, वेड्यांची इस्पितळ तयार करणार आहोत. कारण सत्ता हातात नाही आली तर हे वेडे होतील.” तसेच ‘ऑपरशन कमल’ हे विधानसभा निवडणुकीत दिसून आले आहे. त्यावर आता बोलण्यासारखे काही नाही,” असे देखील राऊत यावेळी म्हणाले.
शिवसेनेला जे वचन दिले होते तेच आता अजित पवारांना दिल्याचे समजते आहे. अजित पवारांना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि २० मंत्रिपदाची ऑफर भाजपने दिली असल्याचे राऊत यांनी सांगितले. दरम्यान, यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी बदनाम केले, बहुमत नसतानाही सत्ता स्थापन केली, असे राऊत म्हणाले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांची मनधरणी
सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स आणि पोलीस हे ऑपरेशन कमळ करतात. बहुमत असते तर हे सगळे करण्याची गरज पडली नसती’, असे सवाल राऊतांनी उपस्थिती केला आहे. “राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांची मनधरणी करण्यासाठी त्यांची भेट घेत आहेत. याबाबत त्यांना विचारले असते. कुटुंबात फूट पडू नये असे वाटते. बाळासाहेब ठाकरेंनी मला राज ठाकरेंशी चर्चा करायला पाठवले. त्यामुळे अजित पवारांना कोण भेटायला जातेय यात आश्चर्यकारक काहीच नाही, असेही राऊत यावेळी म्हणाले. बहुमताचा आकडा प्रतिज्ञापत्र असलेले पत्र दिले आहे,” असे त्यांनी स्पष्ट दिले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.