HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊत उद्या कोणता गौप्यस्फोट करणार?, पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत हे उद्या पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेणार आहे. राऊत उद्या (८ मार्च) सांयकाळी ४ वाजता शिवसेना भवनात घेणाऱ्या पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती ट्वीट करत त्यांनी दिली आहे. यापूर्वी राऊतांनी १५ फेब्रुवारीला पत्रका परिषद घेतली होती. तेव्हा भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणेवर जोरदार टीका केली होती. या पत्रकार परिषदेदरम्यान, भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे चिरंजीव नील सोमय्या या दोघांवर टीकास्त्र सोडले होते. आता राऊत उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. 

राऊत हे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या बद्दल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण राऊतांनी नुकतेच मलिकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. मलिकांच्या अटकेनंतर भाजपने राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला. जाधवांच्या छाप्यात आयकर विभाग जवळपास चार दिवस तपास करत होते. या मुद्द्यांवर बोलणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ST कर्मचाऱ्यांच्या पाठिशी, चुकीच्या नेतृत्वाच्या नाही! – शरद पवार

Aprna

“तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस…”, बहिणीच्या पंकजांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा      

News Desk

“अमरावती दंगलीमागे नवाब मलिकांचाच हात” – हाजी अराफात

News Desk