HW News Marathi
महाराष्ट्र

राऊतांच्या पत्रकार परिषदेपूर्वीच भाजपचे ‘हे’ नेते दिल्लीच्या दिशेने रवाना

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे पत्रकार परिषद घेणार आहेत. राऊत आज (१५ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत नेमके काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या हे दिल्लीला रवाना होणार आहेत. राऊतांच्या पत्रकार परिषदेला अवघे काही मिनिटे शिल्लक असताना भाजपचे दोन्ही नेते दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. राज्यभरातील शिवसैनिक शिवसेना भवनावर दाखल झाले आहेत. 

राऊतांनी काल (१४ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत म्हटले, “बर्दाश्त बहोत किया ना, अब बर्बाद भी हम करेंगें. तसेच भाजपचे साडे तीन लोक तुरुंगात जाणार,” असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकार आणि राऊतांवर आरोपाच्या फैऱ्या झाडत आहेत. पुण्याचे जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. तसेच राऊतांचे वाईन उद्योगात भागीदारी असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. 

दरम्यान, पाटील दुपारी २ वाजून २ मिनिटाला अचानक दिल्लीला रवाना झाले. तर सोमय्या हे आज सायंकाळी ५ वाजता दिल्लीला रवाना होणार आहेत. हे दोन्ही नेते दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकाच दिवशी दोन्ही नेते दिल्लीला जाण्यामुळे राज्यात चर्चेला उधाण आले आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांसाठी आता ठाकरे सरकार सुप्रीम कोर्टात!

News Desk

जळगावमध्ये कोरोनाचा पहिला रूग्ण ,खानदेशात कोरोनाचा शिरकाव !

swarit

दापोली-खेड मार्गावर मॅक्झिमो गाडीची डंपरला धडक, ५ जणांचा मृत्यू

News Desk