HW News Marathi
महाराष्ट्र

कंगणाच्या विरोधात शिवसेनेचा हुकमी एक्का- उर्मिला मातोंडकर

मुंबई | विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त जागेसाठी शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे नाव येणार असे म्हटले जात होते. आणि आता या चर्चांवर शिक्का बसला आहे. उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेच्या प्रस्तावाला होकार दिल्याची माहिती समोर येत आहे. कालपासून उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्या कोट्यातून विधानपरिषेदवर जाणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, उर्मिला काँग्रेस या पूर्वाश्रमीच्या काँग्रेसच्या नेत्या आहेत. त्यामुळे ही शक्यता कितपत खरी ठरणार, याविषयी शंका होती. मात्र, उर्मिला मातोंडकर शिवसेनेचा भगवा हातात घेण्यास राजी झाल्याचे समजत आहे

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली होती. अभिनेत्री कंगना राणावतने बॉलीवूड कनेक्शनच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केले असताना उर्मिला मातोंडकर यांनी सर्वप्रथम तिच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते.

‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उर्मिलानं अनेक विषयांवर भाष्य केलं होतं. कंगना, बॉलिवूड आणि बॉलिवूडमधील काही कलाकारांबद्दल बोलताना दिसतेय. यावर बोलताना उर्मिलानं कंगनावर निशाणा साधाला आहे. ज्या बॉलिवूडनं ओळख मिळवू दिली, पैसा दिला, ज्या शहरानं मोठं केलं याच्या विरोधात बोलणाऱ्या व्यक्तीला उत्तरही दिलंच पाहिजे असंही उर्मिला म्हणाली होती.

कंगना आज एक बोलते उद्या एक बोलते, त्यामुळं तिचा खोटेपणा समोर असल्याचंही उर्मिला म्हणाली. खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला आपण काय बोललो हे लक्षात नसतं. तसंच काही तरी कंगनाचं झालं असल्याचं उर्मिला म्हणाली. आज एका व्यक्तीबद्दल एक बोलते तर उद्या त्याच व्यक्तीबद्दल काही ती वेगळं बोलतेय, असे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होतायत, असं म्हणत उर्मिलानं कंगनाची चांगलीच शाळा घेतली होती.

यावर टाइम्स नॉउला दिलेल्या मुलाखतीत कंगनानं उर्मिलावर टीका केली होती. ‘उर्मिलाची एक अपमानास्पद मुलाखत पाहिली. ज्या प्रकारे ती माझ्याबद्दल बोलत आहे, ते अत्यंत चिढ आणणारं आहे. माझ्या संघर्षाची खिल्ली उडवण्यात आली आहे. तिकीट मिळावं म्हणून भाजपला खूष करण्यासाठी मी हे करत असल्याचं तिनं म्हटल असलं तरी हे माझ्यासाठी अवघड नाहीए’, असं कंगनानं म्हटलं होते.

कंगना इतकं म्हणून थांबली नाही तर तिनं उर्मिलाचा उल्लेख चक्क सॉफ्ट पॉर्न स्टार असा केल्यानं नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्न स्‍टार आहे. त्यामुळं नक्कीच तिची ओळख अभिनेत्री अशी केली जात नाही. जर तिला तिकीट मिळू शकतं तर मला का नाही? असं कंगनानं म्हटलं होतं त्यामुळे आता शिवनसेनेतून विधानपरिषदेत नाव गेल्याने या दोघींमध्ये नव्या वादाला सुरुवात होणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

दरम्यान, विरोधी पक्षाकडून उर्मिलांच्या या निर्णयावरुन टिका करण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देत असल्याने जुन्या शिवसैनिकांनो तुम्ही फक्त खुर्च्या, स्टेज लावा, असा टोला भाजपचे नेते निलेश राणे यांनी लगावला आहे. तसेच, एक वेळ अशी येईल की, एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्त्ये असतील पण शिवसेनेत नसतील, अशी टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गणपती उत्सवासाठी कोकणात २५०० जादा गाड्या! –  अनिल परब

Aprna

डिसले गुरुजी पुन्हा चमकले… जागतिक स्तरावर आणखी एक सन्मानाचे पद प्राप्त

News Desk

कल्याण डम्पिंग ग्राऊंडवरील कच-याच्या आगीतून संशयाचा ‘धूर’

News Desk