HW News Marathi
महाराष्ट्र

BMC निवडणुकीपूर्वी २००० कोटींचे प्रस्ताव समितीसमोर आणण्याची योजना; भाजप आमदाराचा आरोप

मुंबई | भाजप आमदार अमित साटम यांनी बीएमसीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. “येत्या बीएमसी निवडणुकीत सत्ता पालट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. शिवसेना ही बीएमसीच्या निवडणुकीपूर्वी २००० कोटी रुपयांचे १८० नवीन प्रस्ताव समितीसमोर आणण्याची योजना आखली आहे. यामुळे शिवसेना आता पुन्हा सत्तेत येणार नाही. आणि उरलेल्या बैठकीमध्ये जेवढा मुंबईकरांचा पैसा ओरबाडता येईल, तेवढा प्रयत्न करणे हेच या मागचे उद्देश दिसते. समजून बीएमसीच्या तिजोरीवर डल्ला मारत आहे, ” असा दावा अमित साटम यांनी केला आहे. 

साटम म्हणाले, “शिवसेना नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी केली आहे. अधोरेखित करताना साटम म्हणाले की, या सगळ्याचा बीएमसीतील भ्रष्टाचाराशी संबंध आहे. गेल्या पाच वर्षांत भ्रष्टाचाराने बरबटलेल्या स्थायी समितीमध्ये ५० हजार कोटींहून अधिक प्रस्ताव मंजूर करण्यात आले. आम्ही म्हणत आहोत की, गेल्या 25 वर्षात देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार बीएमसीमध्ये झाला आहे. ज्याची किंमत 3 लाख कोटी आहे.”

साटम नेमके काय म्हटले

“गेल्या २ दिवसांपासून स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्ट कंत्राटदारांवर आयटी विभागाच्या धाडी सुरू आहेत. जी आकडेवारी समोर येत आहे. त्यात गेल्या ५ वर्षात ५०००० कोटींपेक्षा जास्तचे प्रस्ताव समितीमध्ये पारित झाले होते. आणि त्यात भ्रष्टाचार झालेला आहे. गेल्या पंचवीस वर्षांमध्ये मुंबई महानगर पालिकेमध्ये 3 लाख कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबईकर जनता मुंबई महानगपालिकेच्या या भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना उखडून फेकल्या शिवाय राहणार नाही. ही लढाई असत्याच्या विरुद्ध सत्याची आहे. अधर्माच्या विरुद्ध धर्माची आहे. अन्यायाच्या विरुद्ध न्यायाची आहे. ही लढाई आहे मुंबईकर विरुद्ध आदित्यसेना” असेही अमित साटम यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नेहमी ‘अभ्यास’ करणाऱ्या नेत्याने ‘अभ्यास’ न करताच माझ्यावर टीका केली?

News Desk

बी एच आर मुळे हजारोंचे संसार उध्वस्त झाले ! एकनाथ खडसे

News Desk

शिवसेनेने विश्वासार्हतेचे फाटलेले ठिगळ सावरण्यासाठी शाहू महाराजांची घेतली भेट! – प्रविण दरेकर

Aprna