HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यसरकाचा पाठिंबा काढणार शिवसेना

मुंबई-नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोरात असतानाच शिवसेनेनेही भाजपला हादरा देण्याची तयारी सुरू केली आहे. सोमवारी शिवसेना आमदार, खासदार आणि मंत्र्यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक झाली. सरकारचे काय करायचे असा प्रश्न सध्या आहे. पण शिवसेना निर्णयाच्या जवळ आली असून, आणखी काही काळ प्रतीक्षा करा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देत शिवसेनेने भाजपला अल्टिमेटमच दिला आहे.

सोमवारी ह्य मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्री, आमदार आणि खासदार यांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांनी उद्धव ठाकरेंसमोर नाराजीचा पाढा वाचला. सत्तेत असूनही विकास कामे होत नसल्याची तक्रार आमदार- खासदारांनी उद्धव ठाकरेंकडे केल्याचे समजते. सरकारबाबत काय भूमिका घ्यायची, असा प्रश्न पक्षश्रेष्ठींनी आमदारांना विचारला होता, असे वृत्त मराठी वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. यावर उद्धव ठाकरेंनी निर्णय घ्यावा, आमचा पाठिंबा असेल असे आमदारांनी सांगितल्याचे समजते.

बैठकीनंतर संजय राऊत यांनी ट्विटरवर एक ट्विट केले आहे. यामध्ये राऊत म्हणाले, ह्य सरकारचे काय करायचे?, होय, शिवसेना निर्णयाच्या जवळ आली आहे. थांबा आणि प्रतीक्षा करा. तर रामदास कदम यांनीही प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. शिवसेनेची महत्त्वाची बैठक झाली. त्यामध्ये आमदार, खासदार, मंत्री उपस्थित होते. सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय योग्य वेळेला घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत OBC Reservation ला सर्वोच्च न्यायालयाकडून मंजुरी

Aprna

कुलाबा, ठाणे, अमरावती येथील वैद्यकीय महाविद्यालयांच्या एमबीबीएस, एमडी अभ्यासक्रमाच्या प्रवेश क्षमतेत वाढ! – अमित देशमुख

Aprna

फडणवीस संभाजीराजेंना म्हणाले,”मराठा आरक्षणासाठी मी कोणासोबतही बसायला तयार पण…”

News Desk