मुंबई। राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता संघर्ष निर्माण झाला होता. यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महाविकासआघाडीचा निर्माण झाला. या महाविकासआघाडीचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथ घेतल्यानंतर तब्बल एक महिन्याने महाविकासआघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज (३०डिसेंबर) दुपारी १ वाजता मंत्रिमंडळाच्या प्रांगणात होणार आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे. या मंत्रिमंडळात जेष्ठ आणि नवीन चेहऱ्याना संधी मिळाणार आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सर्व मंत्र्यांना शपथ देणार आहेत. शिवसेनेचे १३ मंत्री शपथ घेणार आहेत, त्यामध्ये १० कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्र्यांचा समावेश असू शकतो. राष्ट्रवादीचे १३ मंत्री शपथ घेणार आहेत त्यामध्ये कॅबिनेट १० आणि तीन राज्यमंत्री शपथ घेऊ शकतात. काँग्रेसचे १० मंत्री शपथ घेणार आहेत, त्यामध्ये ८ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ३५ नव्या मंत्र्यांचा समावेश केला जाणार आहे.
Live Update
- आदित्य ठाकरे घेतली मंत्रिपदाची शपथ घेतली
आदित्य ठाकरे यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ @AUThackeray @OfficeofUT @ShivSena #shivsena #MahaVikasAghadi #Maharashtra pic.twitter.com/IXfZyvY8g9
— HW NEWS MARATHI (@hwnewsmarathi) December 30, 2019
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड तसेच काँग्रेसचे नेते अमित देशमुखांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
अमित देशमुख यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ @AmitV_Deshmukh @INCMaharashtra #MahaVikasAghadi #Maharashtra pic.twitter.com/sR11Z4STag
— HW NEWS MARATHI (@hwnewsmarathi) December 30, 2019
- आतापर्यंत काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र शिंगणे, नवाब मलिक, काँग्रेसचे नेते सुनील केदार, शिवसेना नेते संजय राठोड, गुलाबराव पाटील यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ @nawabmalikncp @hwnewsmarathi #MahaVikasAghadi #Maharashtra pic.twitter.com/Qhs0kKOA3c
— HW NEWS MARATHI (@hwnewsmarathi) December 30, 2019
- हसन मुश्रीफ यांनी घेतली मंत्री पदाची शपथ
- धनंजय मुंडेंनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ
धनंजय मुंडे यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ @dhananjay_munde @NCPspeaks #MahaVikasAghadi #Maharashtra pic.twitter.com/P86t69dWA0
— HW NEWS MARATHI (@hwnewsmarathi) December 30, 2019
- अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली
अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ. #MaharashtraVikasAghadi #Ajitpawar @NCPspeaks @AjitPawarSpeaks pic.twitter.com/3oljU3EJJ8
— HW NEWS MARATHI (@hwnewsmarathi) December 30, 2019
- अशोक चव्हाण यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
अशोक चव्हाण यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ@AshokChavanINC #Maharashtra #Maharashtra pic.twitter.com/H6hWJ0Yl34
— HW NEWS MARATHI (@hwnewsmarathi) December 30, 2019
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार सहकुंटुंब परिवारासह विधानभवनात दाखल झाले
- ठाकरे सकारच्या मंत्रिमंडळात एकूण ३५ नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहे, शपथ घेणाऱ्या ३५ आमदारांची यादी जाहीर
- सव्वा महिन्यात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
- महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे राजू शेट्टी यांना निमंत्रण नाही
- शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता
- धनंजय मुंडे घेणार मंत्रिपदाची शपथ, शरद पवारांच्या भेटीला ‘सिल्व्हर ओक’वर पोहोचले, राजकीय जीवनातील एक नवीन जबाबदारी आज स्वीकारत आहे, धनंजय मुंडेंनी ट्वीट केले
राजकीय जीवनातील एक नवीन जबाबदारी आज स्वीकारत आहे. आईच्या आशीर्वादाने, वडील स्व. अण्णा, आप्पा (स्व. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब) यांच्या प्रतिमेचे दर्शन घेत आणि संतश्रेष्ठ भगवान बाबा यांचे पूजन करत मी या प्रवासाला सुरवात करत आहे. pic.twitter.com/KrRTzTgyQ4
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 30, 2019
- अजित पवार, नवाब मलिक शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर
- आज महाआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे एकूण ३६ जण घेणार मंत्रिपदाची शपथ.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.