HW News Marathi
महाराष्ट्र

किशोरी पेडणेकर मुंबईच्या नव्या महापौर

मुंबई | शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर मुंबईच्या नव्या महापौर पदी विराजमान झाल्या आहेत. किशोरी पेडणेकर यांची महापौर पदी बिनविरोधी निवड झाली आहे. तर उपमहापौर पदी सुहास वाडकर यांचे नियुक्ती झाली आहे. पेडणेकर या महापालिकेच्या १९१ जी/एस वरळीतील गांधीनगर-डाऊन मिलमधील नगरसेविका आहेत.

पेडणेकर या वरळीतील बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल शाळेतून १० वीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. पेडणेकर या तीन वेळा नगरसेविका राहिल्या आहेत. काही काळासाठी त्यांनी एका वर्षासाठी स्थापत्य शहर समितीच्या अध्यक्षा होत्या. तसेच पेडणेकर यांना पालिका कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. पेडणेकर यांना 2017-18 वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे.

मुंबईच्या महापौरपदासाठी यशवंत जाधव, मंगेश सातमकर, आशिष चेंबुरकर, विशाखा राऊत, शेखर वायंगणकर यांनी महापौरपदासाठी दावा केला होता. मात्र किशोरी पेडणेकर आणि यशवंत जाधव यांची नावे आघाडीवर होती. मात्र, शेवटच्या क्षणी किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

 

 

Related posts

मराठी कलाकारांच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा, आशिष शेलारांकडून सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना फोन!

News Desk

प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊनही पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतंय, कशाला नोंद घेताय!, अजित पवारांचा पडळकरांना खोचक टोला

News Desk

काहीच कल्पना न देता राजभवनात बोलविले !

News Desk