HW News Marathi
महाराष्ट्र

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा भाजपला दे धक्का!

मुंबई। कल्याण डोंबिवली मधील भाजपच्या तीन माजी नगरसेवकांचा भाजपला धक्का देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपच्या तीन माजी नगरसेवकांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधले.भाजपला हा मोठा धक्का असून पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकित शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचे दिसते. भाजपचे माजी महेश पाटील,माजी नगरसेविका डॉ. सुनिता पाटील आणि सायली विचारे यांसह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. प्रकृती चांगली नसल्याने डॉ. सुनिता पाटील या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. तर पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमूख उपस्थितीत या सर्वांनी आपल्या हाती शिवबंधन बांधले.

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेची ताकद आणखीच वाढणार

आगामी केडीएमसी निवडणुकीची प्रत्यक्ष रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच शिवसेनेने भाजपला धक्का दिल्याने भाजपमध्ये आता कल्याण-डोंबिवलीत तणावाचं वातावरण निर्माण झालंय. माजी नगरसेवक महेश पाटील हे भाजपला राम राम करणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र शिवसेनेत प्रवेशाची तारीख गुलदस्त्यात असल्याने सर्वाना उत्सुकता लागली होती.महेश पाटील यासह आणखी दोन नगरसेवक व भाजप पदाधिकारी संजय राणे यांनी जाहीर प्रवेश केल्याने कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेची ताकद आणखीच वाढणार आहे.

एक पक्ष प्रवेशाच्या प्रसंगी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण डोंबिवली मनपाच्या माजी महापौर विनिता राणे, शहरप्रमुख राजेश मोरे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उप जिल्हाप्रमुख राजेश कदम, उप जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, आणि या बरोबरच आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“महाविकास आघाडी सरकारची कार्यपद्धती ही तिघाडीची”, मेट्रो कारशेडवरुन शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

News Desk

भाजप नेते प्रसाद लाड यांना आर्थिक गुन्हे शाखेने बजावले समन्स

News Desk

उद्धव ठाकरेंसाठी पवारांचे नातू आले धावून..थेट पंतप्रधानांनाचं केलं टार्गेट !

News Desk