HW News Marathi
महाराष्ट्र

शिवजयंती निमित्त भारतात कोरोना योध्यांसह जिल्ह्यातील सर्व शिवस्मारकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार

मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असून, यासाठी समाजातील वेगवेगळ्या स्तरातून जय्यत तयारी सुरू आहे. आर. आर. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनीही यावेळी जरा वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी शिवाजी महाराजांच्या या 391 व्या जयंतीनिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व 140 शिवस्मारकांवर व तसेच कोरोना महामारीच्या काळात लढलेल्या वैद्यकीय अधिकारी, पोलिस व पालिका कर्मचारी, महसूल विभागातील कर्मचारी आणि इतर सर्व कोरोना योद्ध्यांना मानवंदना म्हणून त्यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

भारतात प्रथमच कोरोना योध्यांचा सन्मान हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करून करण्यात येणार आहे. याशिवाय विनोद पाटील यांच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराणा प्रताप सिंह यांसह इतर महापुरुषांच्या स्मारकांवर सुद्धा हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

18 व 19 जानेवारीला होणारी ही पुष्पवृष्टी केली जाईल. पहिल्या फेरीत गंगापुर तालुक्यातील 20 गावांतील स्मारकांवर पुष्पवृष्टी केली जाईल. दुसऱ्या फेरीत औरंगाबाद, खुलताबाद, पैठण आणि फुलंब्री तालुक्यातील गावं असतील तर तिसर्‍या आणि चौथ्या फेरीत औरंगाबाद तालुक्यातील 47 गावं तर शेवटच्या आणि पाचव्या फेरीत सिल्लोड, कन्नड, वैजापूर तालुक्यातील 46 गावांचा समावेश असेल.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस नाही तर फसणवीस सरकारः खा. अशोक चव्हाण

News Desk

‘सचिन वाझेंमुळे ‘मातोश्री’ अडचणीत, वाझेंची हत्या होऊ शकते, ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट

News Desk

‘अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है, इसलिए कब्रस्तान बना’, जितेंद्र आव्हाडांनी केले वादग्रस्त विधान

News Desk