HW News Marathi
महाराष्ट्र

‘अदानी’ बोर्डाची मुंबई एअरपोर्टवर शिवसैनिकांनी केली तोडफोड !

मुंबई | मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर शिवसैनिकांनी अदानी नामफलकाची तोडफोड केली आहे. विमानतळाचे संचालन अदानी ग्रुपच्या हाती गेल्यानंतर ‘अदानी एअरपोर्ट’ अशा पाट्या विमानतळ परिसरात लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी या बोर्डची तोडफोड केली आहे. व्हीआयपी गेट नंबर 8 आणि विलेपार्ले हायवेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरील बोर्ड शिवसैनिकांनी लाठ्यांनी तोडला.

शिवाजी महाराजांच्या नावाचा विसर पडला का?

अदानी कंपनीने आंतराष्ट्रीय विमानतळाचा ताबा घेतल्यावर तिथला फलक बदलण्यात आला आहे. याचाच विरोध करत शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.अदानी कंपनीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा विसर पडला का? असा प्रश्न विचारला आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. मात्र तिथे अदानी विमानतळ असे लावलेले बोर्ड अजिबात सहन केले जाणार नाहीत, असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. जीवीके प्रमाणे ‘मॅनेज्ड बाय अडानी एयरपोर्ट’ असा बोर्ड ठेवण्याची सूचना शिवसेनेने केली आहे. अन्यथा जिथे फलक दिसेल, तिथे तोडफोड करण्याचा सेना नेत्यांनी इशारा दिला आहे.

शिवसेनेकडून नाराजी जाहीर करण्यात आली

मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाचं नाव अदानी केल्याने शिवसैनिकांनी तिथे जाऊन तोडफोड केली आहे. मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा १३ जुलैला अदानींकडे देण्यात आला आहे. यानंतर मुंबई विमानतळावर आणि बाहेर दोन्ही ठिकाणी अदानी विमानतळ असे नामफलक लावण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असणाऱ्या विमानतळावर अदानींच्या नावे नामफलक लावण्यात आल्याने शिवसेनेकडून नाराजी जाहीर करण्यात आली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर नाराजी बोलून दाखवली होती.

दुर्बिणीने पाहावं लागेल इतकं छोटं महाराजांचं नाव बाह्यांवर आहे

महाराजांचं नाव काढल्यामुळे राजकारणात नवीन वादाला सुरुवात झाली आहे. “अदानीने कर्मचाऱ्यांना दिलेल्या टी-शर्ट्सवर अदानी विमानतळ लिहिलं आहे. दुर्बिणीने पाहावं लागेल इतकं छोटं महाराजांचं नाव बाह्यांवर आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. सांगूनही जेव्हा दुर्लक्ष केलं जातं तेव्हा अशी प्रतिक्रिया दिली जाते. ते काय अदानी एअरपोर्ट आहे का ?. याआधी असणाऱ्या जीव्हीकेने असे बोर्ड लावले होते का?,” अशी विचारणा शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.

“छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट हे नाव फक्त महाराष्ट्र, मुंबई किंवा देशापुरतं नसून संपूर्ण जगभरात ओळखलं जातं. याआधी जीव्हीकेसारख्या मोठ्या कंपन्या तिथे होत्या. पण त्यांनी कधीही विमानतळाला नाव दिलं नाही. अदानींनी विमानतळ विकत घेतलं आहे का? विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं असताना जाणुनबुजून मुंबई, महाराष्ट्र अस्थिर करण्याचं काम का करत आहेत? कशासाठी?,” अशी विचारणा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्णब गोस्वामी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

News Desk

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी वाघाला दत्तक घेतले

News Desk

मराठा आरक्षणाबाबतीत सरकारच्या भूमिकेत सुरूवातीपासूनच समन्वय नव्हता – संभाजीराजे

News Desk