HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेकडून राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटी रुपयांचे योगदान !

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरच्या ट्रस्टच्या अध्यक्षांना २७ जुलैला १ कोटी रुपये शिवसेनेकडून दिल्याने पत्र लिहिले आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्या यात्रेदरम्यान राम मंदिराच्या निर्माणासाठी १ कोटी रुपयांचे योगदान करण्याचा संकल्प केला होता. त्याप्रमाणे २७ जुलैला राम मंदिरासाठी १ कोटींची देणगी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडे RTGS द्वारे जमा करण्यात आली आहे. ‘राम मंदिरासाठी केलेल्या आंदोलनात बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने भाग घेतल्याचे पत्रात नमूद आहे. तसेच माझीही प्रभू रामावर श्रद्धा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे. याशिवाय आरटीजीएस क्रमांक आणि बॅंकेची माहिती या पत्रात लिहिली आहे.

पुढे त्यांनी पत्रात असेही म्हटले आहे की तुलसीदास यांनी म्हटले होते की, ‘बिनू सेवा जो द्रवै दिन पर राम सरिस कोउ नाही’ हे सत्य असल्याचे उद्धव ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे. अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसेनेकडून १ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यादरम्यान केली होती. त्याचबरोबर त्यांनी योगी सरकारकडे अयोध्येत महाराष्ट्रातून येणाऱ्या रामभक्तांसाठी ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची विनंतीही केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंतिम वर्ष परीक्षांच्या तारखा घोषित! घरात बसून देता येणार परिक्षा…

News Desk

आता धनगर समाजाला देखील लागू होणार अनुसूचित जमातीच्या २२ योजना

News Desk

मोदी सरकारविरुध्द काँग्रेसचा अतिविराट मोर्चा

News Desk