HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपच्या  घोटाळेबाज मंत्र्यांना शिवसेनेने केले लक्ष 

उद्धव यांनी वाटल्या भाजपच्या घोटाळ्यांची पुस्तिका

मुंबई – कर्जमुक्ती असो अथवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या असो शिवसेनेनं भाजपला लक्ष केले आहे. महागाई विरोधातही शिवसेना रस्त्यावर उतरली होती. आता शिवसेनेनं आपला मोर्चा भाजपच्या ज्या मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप झाले त्यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. त्याची माहिती देणारी एक पुस्तिकाच शिवसेनेनं प्रकाशीत केली आहे. शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज शिवसेना भवनमध्ये झाली.

त्यावेळी ही पुस्तिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या पदाधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे उद्धव यांनी भविष्यातील राजकारणाची दिशा काय असेल याचे संकेतच दिले आहेत. घोटाळेबाज भाजप असे या पुस्तिकेचे शिर्षक देण्यात आले आहे. त्याच्या मुखपृष्ठावर भ्रष्ठाचाराचे आरोप झालेल्या एकनाथ खडसे, विनोद तावडे, गिरीश बापट आणि भाजप खासदार दिलीप गांधी यांचे छायाचित्र छापण्यात आले आहे. शिवाय आता पर्यंत किती घोटाळे भाजपच्या काळात झाले त्याची यादीही यात देण्यात आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील भ्रष्ठाचारा बाबतच यात उल्लेख नाही तर केंद्रातील नेत्यांनी आणि भाजपची सरकार असलेल्या राज्यात झालेल्या घोटाळ्यांचाही उल्लेख यात आहे. उद्धव यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे शिवसेना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी आत्तापासूनच करत आहे हे स्पष्ट आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बघून घेईन ! अर्णब गोस्वामींची मुख्यमंत्र्यांना लाईव्ह कार्यक्रमात थेट धमकी

News Desk

ही तर नुसती सुरुवात, अजून महत्त्वाचा भाग बाहेर येणे बाकी ! | फडणवीसांचा सूचक इशारा  

News Desk

ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा एकत्र चिपळूण दौऱ्यावर

News Desk