HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेचे नेते अनंत तरे यांचे निधन

ठाणे | शिवसेनेचे नेते, ठाण्याचे माजी महापौर, माजी आमदार आणि कोळी समाजाचे नेते अनंत तरे यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. ब्रेन हॅमरेज झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. अनंत तरे यांना ब्रेन हॅमरेज झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या दुपारी २ वाजता ठाण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे ठाणे जिल्हा एका मोठ्या नेत्याला मुकल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

कोण होते अनंत तरे?

  • अनंत तरे हे शिवसेनेचे फायरब्रँड नेत्यांपैकी एक होते.
  • त्यांनी ठाणे महापालिकेचे महापौरपद भूषविलं होतं.
  • ते २००० ते २००६ या दरम्यान विधानपरिषदेवर आमदार होते.
  • शिवसेनेचा कोळी समाजाता बडा चेहरा अशी त्यांची ओळख होती.
  • एकविरा देवी ट्रस्टचेही अध्यक्ष होते.
  • २०१४ मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्यावरुन त्यांचे शिवसेनेशी मतभेद झाले होते. मात्र त्यांची मनधरणी करण्यात शिवसेनेला यश आलं होतं.
  • शिवसेनेने २०१५ मध्ये त्यांची पालघर जिल्हा संपर्कप्रमुखपदी वर्णी लावली होती.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MPSCच्या परीक्षा मार्चमध्ये होण्याची शक्यता

News Desk

अनिल देशमुखांच्या मागावर; लूकआऊट नोटीस जारी, लवकरच अटकेची शक्यता!

News Desk

आम्ही कॉंग्रेस, राष्ट्रवादीला राज्यातून भुईसपाट केले आहे !

News Desk