HW News Marathi
महाराष्ट्र

‘नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा’ गोपीचंद पडळकर अडचणीत!

सांगली | भाजप आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. नियम तोडून बैलगाडा शर्यत आयोजित करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत, असं सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. माझं जिल्हा पोलिस अधिक्षकांशी बोलणं झालंय. त्यांच्या नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत, असं सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे.

पाडळकरांचा डाव यशस्वी

कायद्याने बंदी घालून सुद्धा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी बैलगाडा शर्यत आयोजित केली. मात्र कोणत्याही परिस्थितीत बैलगाडा शर्यत पार पडणारच, असा निर्धारच पडळकरांनी केला होता. त्यानुसार पडळकर आणि त्यांचे समर्थक कामाला लागले. आणि शासन प्रशासनाला कात्रजचा घाट दाखवून पडळकर समर्थकांनी स्पर्धा भरवून दाखवली आहे. न्यायालयाची बंदी असताना आज सकाळी पहाटे साडे वाजण्याच्या सुमारास भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी झरे गावालगत एका मैदानावर बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे.

पडळकरांवर कारवाईचे आदेश

“बैलगाडा शर्यतीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनामार्फत जमावबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात शर्यतीचं आयोजन होणार होतं, ते झालेलं नाही, परंतु आमच्याकडे काही रिपोर्ट्स आलेत, त्यानुसार चार-पाच बैलगाड्यांनी शर्यतीत भाग घेतला. या संबंधी सांगलीच्या पोलीस अधिक्षकांशी माझं बोलणं झालेलं आहे. याची संपूर्ण सखोल चौकशी करुन याविषयी संबंधितांवर कायदेशी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत”, अशी प्रतिक्रिया सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

गोपीचंद पडळकर काय म्हणाले?

आमदार गोपीचंद पडळकर यांचा या बैलगाडा शरियातीत मुख्य हात आहे. स्पर्धेनंतर ते म्हणाले, “काही शेतकऱ्यांनी, बैलगाडा चालक मालकांनी बैलगाडा शर्यत पार पाडली असल्याचं आम्हाला प्रसारमाध्यमांतून कळत आहे. आम्ही आणखी त्या ठिकाणी गेलेलो नाही. झरे गावात मोठा पोलिस फौजफाटा होता. कायदा आणि सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने आम्हाला विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान आम्ही दिला. पण आता आम्हाला काही शेतकऱ्यांनी स्पर्धा पार पाडली आहे, अशी माहिती कळतीय”.

बैलगाड्याला जात, पात, धर्म, प्रांत काहीही नाही…

“बैलगाडा हा कोणताही समर्थक नाही. बैलगाड्याला जात, पात, धर्म, प्रांत काहीही नाही… गोवंश हा वाचवला पाहिजे, त्याचं जतन केलं पाहिजे, अशी आमची साधी भूमिका आहे. जर आपण गोवंश जतन केला नाही, तर येणाऱ्या पिढीला आपल्याला चित्रात बैल दाखवण्याची वेळ येईल”, असं पडळकर म्हणाले आहेत.

नेमकं काय घडलं?

झरे गावात बैलगाडा शर्यत पार पडणार होती. मात्र पोलिसांनी गावच्या मुख्य मैदानाची धावपट्टीच उखडून टाकली होती. त्यानंतर मात्र पडळकर समर्थकांनी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास तिथूनच पाच किमी अंतरावर दुसऱ्या एका मैदानात धावपट्टी तयार केली आणि पुढच्या काही तासांत तिथे स्पर्धा भरवली.

या शर्यतीत पाच ते सहा बैलगाडा चालक आणि मालक सहभागी झाले होते. तसंच ही स्पर्धा पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. यानिमित्ताने पडळकर समर्थकांनी पोलिस आणि प्रशासनाला मोठा गुंगारा दिल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांना गाफील ठेऊन ही शर्यत पार पडली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डीमध्ये ५ वर्षीय अल्पवयीन बालकाची निर्घृण हत्या

News Desk

सावंतवाडीतील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीला गती द्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Manasi Devkar

बेछूट आरोपांपेक्षा आत्मचिंतन करा, अशोक चव्हाणांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला  

News Desk