संजय राऊत तर रॉकस्टार!
पुणे | शिवसेना प्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली आहे. या अभियानचं उदघाटन शिवसेना नेत्या व अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते आज (१२ जुलै) पुण्यात करण्यात आलं होतं. या उदघाटनाच्या कार्यक्रमात बोलताना, ‘संजय राऊत म्हणजे रॉकस्टार आहेत’ असं वक्तव्य उर्मिला मातोंडकर यांनी केलं आहे.
संजय राऊत रॉकस्टार आहेत…..
शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यात काही दिवसांपासून शाब्दिक वादावादी सुरु आहे. चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या की, “संजय राऊत हे अनेक लोकांच्या अनेक टीका सहन करून त्यांच्यावर चोरावर मोर करायला भरपूर सक्षम आहेत. त्यावर मी काय बोलू… ते रॉकस्टार आहेत,” असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या आहेत.
काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?
संजय राऊतांनी पंतप्रधानांवर टीका केल्यावर भाजपच्या चित्र वाघा यांनीही राऊतांवर निशाणा साधला आहे. यावेळेस त्यांनी थेट सामनावर निशाणा साधला. दैनिक सामना हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आला. पण त्यांच्या विचारांना बगल देत संजय राऊत स्वत:च्या फायद्यासाठी गैरवापर करत आहेत. भीमा कोरेगाव दंगल प्रकरणातील मुख्य आरोपींना राऊत आपल्या लेखणीतून बळ देत असल्याचा गंभीर आरोपही चित्रा वाघ यांनी केला आहे.
पत्रकारांच्या स्वातंत्र्याचा अचानक उमाळा @rautsanjay61 यांना आला
अहो आपल्याच मविआ सरकारने लॉकडाऊन नियमावलीचा गैरफायदा घेतं पत्रकार @RahulAsks यांची मुस्कटदाबी करत तुरुंगात डांबले
अधिवेशनानंतर पत्रकारांच्या प्रश्नांपासून मा.मुख्यमंत्र्यांनी कसा पळ काढला हे ही पत्रकारांनी पाहिलंय pic.twitter.com/RjSi0qqxb1— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 12, 2021
संजय राऊत आपल्या विरोधी पक्षावर नेहमीच टीका करत असतात. यावेळीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी त्यांच्या ट्विटद्वारे राऊतांना प्रत्युत्तर केलं आहे. ज्या प्रकारे इंदिरा गांधी जॉर्ज फर्नांडिस यांना घाबरत होत्या तसंच पंतप्रधान मोदी हे स्टॅन स्वामी यांना घाबरत होते, याचा जावई शोध राऊत यांनी लावला, असं म्हणत चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना चांगलंच फटकारलं आहे. वाघ यांनी यासंदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.