औरंगाबाद | औरंगाबादमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना एक धक्का दिला आहे. खैरेंच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात मनसेमध्ये पक्षप्रवेश केला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. औरंगाबाद महापालिका निवडणुकांचे बिगुल कधीही वाजू शकते. निवडणुका तोंडावर असताना मनसेने मोर्चेबांधणी सुरु केलेली दिसत आहे.
चंद्रकांत खैरे यांच्या निष्ठावंत समर्थकांनी मनसेत प्रवेश केला. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात हे प्रवेश झाले. औरंगाबाद शिवसेनेत उपशहर प्रमुख, जिल्हा संघटक अशी पदे भूषवलेल्या सात बड्या शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केला.मनसेत प्रवेश केलेले काही शिवसैनिक माजी नगरसेवकही आहेत. औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर हा शिवसेना आणि चंद्रकांत खैरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे, मनसे नेते @anilshidore, मनसे नेते @abhijitpanse आणि संभाजीनगर जिल्हाध्यक्ष श्री. सुहास दशरथे ह्यांच्या उपस्थितीत विविध संघटनांमधील प्रमुख कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश. #महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्रसैनिक pic.twitter.com/Ayh83iO8jv
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 31, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.