HW News Marathi
महाराष्ट्र

‘ICHR ने पंडित नेहरुंचं चित्र वगळलं’, त्यावर संजय राऊत म्हणाले….

मुंबई। शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे त्यांच्या बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. भारतात इतिहास संशोधनावर काम करणाऱ्या ‘इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च’ (ICHR) या संस्थेने ‘आजादी का अमृत महोत्सव’च्या पोस्टरवरून पंडित नेहरुंचे चित्र वगळले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामना रोखठोकमधून केंद्र सरकार पर्यायाने मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. इतिहास पुसणे हे शौर्य नाही, असा शाब्दिक वार करताना, ज्यांना इतिहास घडवता येत नाही असे लोक इतिहासाचे संदर्भ पुसण्यातच धन्यता मानतात, ही जगभराची ‘रीत’ आहे, असा टोमणाही सामना रोखठोकमधून लगावण्यात आला आहे.

पण पंडित नेहरुंशी वैर का?

राहुल गांधी, प्रियंका, सोनियांशी मोदी सरकार, भाजपचं भांडण असू शकेल, पण पंडित नेहरुंशी वैर का? नेहरुंनी निर्माण केलेली राष्ट्रीय संपत्ती विकूनच आज सरकार अर्थचक्राला गती देत आहे. स्वातंत्र्य लढ्यातील नेहरुंचं स्थान अढळ आहे. तो इतिहास पुसणे हे शौर्य नाही, अशा शब्दात राऊतांनी निशाणा साधला आहे.

विद्यमान सरकारने आपल्या कोत्या मनाचे दर्शन घडविले

संजय राऊत हे कायमच विरोधी पक्षावर निशाणा साधून असतात. भारतीय स्वातंत्र्याचे सध्या 75 वे म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष सुरु आहे. भारतात इतिहास संशोधनावर काम करणाऱ्या ‘इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च’ (ICHR) या संस्थेने ‘आजादी का अमृत महोत्सव’च्या पोस्टरवरून पंडित नेहरुंचे चित्र वगळले.

या पोस्टरवर महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, मदन मोहन मालवीय आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची छायाचित्रे ठळकपणे आहेत, पण पंडित जवाहरलाल नेहरु व मौलाना अबुल कलाम आझाद यांना वगळण्यात आले. नेहरु, आझादांना वगळून स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, पण नेहरूंना खासकरून वगळून विद्यमान सरकारने आपल्या कोत्या मनाचे दर्शन घडविले आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

हा स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येक सैनिकाचा अपमान

ज्यांचा इतिहास घडविण्यात सहभाग नव्हता व देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून जे दूर राहिले अशांकडून स्वातंत्र्य लढ्याचे एक नायक पंडित नेहरुंनाच स्वातंत्र्य लढ्यातून दूर केले जात आहे. हे बरे नाही. पंडित नेहरू व त्यांच्या काँग्रेस पक्षाविषयी मतभेद असू शकतात. नेहरूंच्या राष्ट्रीय, राजकीय, आंतरराष्ट्रीय भूमिका कदाचित कुणाला मान्य नसतील, पण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील नेहरूंचे स्थान राजकीय द्वेषापायी पुसून टाकणे हा स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येक सैनिकाचा अपमान आहे.

‘खेलरत्न’ पुरस्काराचे नावही बदलून आपला द्वेष जगजाहीर केला

विद्यमान मोदी सरकारचे सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधींशी राजकीय भांडण असायला हरकत नाही. सरकारने राजीव गांधी यांच्या नावाने दिल्या जाणाऱया ‘खेलरत्न’ पुरस्काराचे नावही बदलून आपला द्वेष जगजाहीर केला, पण पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांचे स्वातंत्र्य लढय़ातील आणि देशाच्या जडणघडणीतील योगदान हा अमर इतिहास आहे. तो नष्ट करून काय साध्य होणार?

नेहरुंचं चित्र वगळणाऱ्या ICHR ने हे पुस्तक नजरेखालून घातले पाहिजे

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात नेहरुंनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला. ‘भारत छोडो’ आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा जनसंघाचे संस्थापक कुठेच नव्हते. नेहरू, पटेल या आंदोलनात तुरुंगात गेले. या घटनेवर प्रकाश टाकणारे एक पुस्तक ‘काँग्रेस रेडिओ’ असे प्रसिद्ध झाले. उषा ठक्कर त्याच्या लेखिका आहेत. स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातून नेहरुंचं चित्र वगळणाऱ्या ICHR ने हे पुस्तक नजरेखालून घातले पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आमचा खून झाला तरी लढाई चालू राहिलं’, मराठा आरक्षणविरोधी याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते

News Desk

‘एमटीपी’च्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय मंडळांची नियुक्ती करावी; डॉ नीलम गोऱ्हेंच्या सूचना

Aprna

वेठबिगारीसारख्या घटना रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत सामाजिक न्याय मंत्री बैठक घेणार

Aprna