HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊत यांच्या कन्येचा साखरपुडा, ठाकरे, फडणवीस, पवार पुन्हा एकाच मंचावर येणार!

मुंबई | सध्या लगिनसराई सूरू आहे. अशात आता शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्याही कन्येचा आज( ३१ जानेवारी) मुंबईत साखरपुडा आहे. या मंगलप्रसंगी राज्यातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या सोहळ्यानिमित्त एकत्र येणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणानंतर पुन्हा एकदा हे दिग्गज नेते एकत्र येणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशीच आज संध्याकाळी ७ वाजता ग्रँड हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये साखरपुडा होणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशी यांचा साखरपुडा होणार आहे. राऊत यांच्या घरातील हे पहिलंच मंगलकार्य आहे. त्यानिमित्ताने राऊत यांनी मोजक्याच मान्यवरांना या मंगल सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिलं आहे.

या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना साखरपुड्याचे आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे या सोहळ्यानिमित्ताने हे सर्व दिग्गज नेते एकत्र येणार आहेत. त्यामुळे या दिग्गजांच्या उपस्थितीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज भेटीची कल्पना नव्हती. संभाजीराजेंची माहिती

News Desk

नागपूर मेट्रोची जॉय राईड

News Desk

मी नाराज आहे, ही बातमी मुळात चुकीची आहे !

News Desk