HW News Marathi
देश / विदेश

‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर हवा, राज ठाकरेंनाही फटका बसेल ! मुंबईसाठी राऊतांची साद

मुंबई | मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी ,मुंबई महानगरपालिकेची बाबरशी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तुलना चक्क रावणाशी केल्यानंतर आज सामनाच्या रोखठोक या सदरामध्ये कंगनाच्या समाचार खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे.इतकचं नाही तर ठाकरे ब्रॅंडचे घटक असलेल्या राज ठाकरे यांनाही त्यांनी या निमित्ताने साद घातली आहे.

सामनाच्या रोखठोक सदरामध्ये असं म्हटलंय का , ‘मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न पद्धतशीर सुरू आहे. मुंबईची बदनामी हा एक त्या कारस्थानचाच भाग आहे. मुंबईस पाकिस्तान म्हणणारी एक नटी, तसेच मुख्यमंत्र्यांना अरे तुरे करणा-या एका वृत्तवाहिनीच्या संपादकाच्या मागे कोण आहेत? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर कुणीही उठावे आणि मुंबई महाराष्ट्रावर चिखलफेक करावी हे आता तरी थांबले, असे आव्हान महाराष्ट्रातील जनतेला केले आहे. खा. संजय राऊत यांनी कंगना राणावत प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सामना रोखठोकमधून साद घातल्याचे चित्र आहे.

‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर हवा, राज ठाकरेंनाही फटका बसेल !

मुंबईला पाकिस्तान व महापालिकेस बाबराची सेना असे बोलणाऱ्यांच्या मागे महाराष्ट्रातील प्रमुख विरोध पक्ष उभा राहतो हे विचित्र आहे. पण सुशांत आणि कंगनास पाठिंबा देऊन त्यांना बिहारच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. बिहारातील उच्चवर्णी रजपूत, क्षत्रिय मते मिळवण्यासाठी हा खटाटोप आहे. त्यासाठी महाराष्ट्राचा अवमान झाला तरी चालेल. हे धोरण राष्ट्रीय म्हणवून घेणाऱ्यांना शोभणारे नाही. महाराष्ट्राचा अवमान केला म्हणून दिल्लीतील एकही मराठी केंद्रीय मंत्र्यास वाईट वाटले नाही तेथे संतापून राजीनामा वगैरे देण्याची बातच सोडा. ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रॅण्ड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डलाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायाचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ब्रॅण्डचे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरूवात होईल. अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवार ममता बॅनर्जी यांच्यासोबत चर्चेसाठी पश्चिम बंगालला जाणार !

News Desk

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निरोप

News Desk

विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे अलाहाबाद मध्ये दंगल

News Desk