HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेकडे कट्टर निस्वार्थी अकाउंट्स आहेत, सेनेचा भाजपला जोरदार टोला 

मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या तपासाची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियातून मोहीम चालवली गेली होती, अशी माहिती समोर आली. याच मुद्यावरून शिवसेनेने विरोधी पक्षाला कोणाचेही नाव न घेता फटकारले आहे.शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक यांनी ट्विट करत मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्यांना सुनावलं आहे. “ज्या महाराष्ट्रात तुम्ही राहता, त्या महाराष्ट्र भूमीची सुरक्षा घेणाऱ्या मुंबई पोलिसांची खोटी बदनामी करायला तुम्हाला ८० हजार फेक अकाउंट्स तयार करावे लागतात. पण शिवसेनेकडे कट्टर निस्वार्थी अकाउंट्स आहेत, महाराष्ट्र व मुंबईची जनता आहे. जे तुमचा बाजार एकाच दिवसात उठवतात,” असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.ज्या महाराष्ट्रात तुम्ही राहता त्या महाराष्ट्र भूमीची सुरक्षा घेणाऱ्या मुंबई पोलिसांची खोटी बदनामी करायला तुम्हाला ८० हजार फेक अकाउंट्स तयार करावे लागतात. पण शिवसेनेकडे कट्टर निस्वार्थी अकाउंट्स आहेत, महाराष्ट्र व मुंबईची जनता आहे जे तुमचा बाजार एकाच दिवसात उठवतात.

सुशांत प्रकरणाचा तपास करत असताना मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी ८० हजार बनावट खाती सोशल मीडियावर तयार करण्यात आली होती, असे मुंबई पोलिसांच्या तपासातून समोर आली. सायबर सेलने यासंदर्भात एक अहवाल तयार केला असून, त्यात सुशांतची आत्महत्या व मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकारची बदनामी करणाऱ्या पोस्टचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही याला दुजारो दिला आहे असून, याच मुद्यावरून शिवसेनेनं विरोधकांवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बांधकाम व्यावसायिक डिएसकें विरोधात ३६,८७५ पानांचे आरोपपत्र दाखल 

News Desk

खडसेंची ईडीची समन्स् रद्द करण्यासाठी न्यायालयाकडे मागणी

News Desk

‘MPSC ला जागा देण्यास २ वर्षे’, रोहित पवारांच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ

News Desk