HW News Marathi
देश / विदेश

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत शिवसेनेने १०० जागांवर लढण्याचे दिले संकेत

नवी दिल्ली | राज्यात पालिका, ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यासाठी महाविकासआघाडी सरकार आणि इतर पक्ष तयारीत दिसत आहेत. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमधल्या निवडणुकीला अद्यापही काही काळ शिल्लक आहे. परंतु आतापासून राजकीय पक्षांनी या निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केलेली पाहायला मिळत आहे. भाजप, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि काँग्रेसबरोबरच ओवेसींची पार्टी AIMIM सुद्धा निवडणुका लढणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनंही पश्चिम बंगालमध्ये १०० जागांवर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे यंदा पश्चिम बंगालच्या निवडणुकीत वेगळीच रंगत येणार आहे.

टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम बंगालच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुद्धा पश्चिम बंगालचा दौरा करू शकतात. शिवसेना कोलकाता, हुगळी, दमदमसह अनेक भागांत आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकते. तसेच निवडणूक लढण्याचा अंतिम निर्णय २९ जानेवारीला पक्षाच्या बैठकीत होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेनं निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा विचार केल्यास त्याचा भाजपला फटका बसू शकतो. भाजपनं या निवडणुकीत संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. शिवसेनेनं २०१९मध्येही बंगालमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरवले होते. त्यावेळी शिवसेना आणि भाजप राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटकपक्ष होते. पण शिवसेना महाविकास आघाडीमध्ये सामील झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये ताटातूट झाली.

शिवसेनेच्या महत्त्वपूर्ण पावलानं अनेक पक्षांना धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण ओवैसी यांच्या पश्चिम बंगालमधील एंट्रीनंतर शिवसेनेच्या संजय राऊतांनीही सूचक प्रतिक्रिया दिली होती. कोणीही काहीही करा पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच जिंकणार, असंही संजय राऊत म्हणाले होते. राऊतांचे म्हणणे खरे ठरणार का? काय होणार या निवडणुकीत हे येणारा काळच ठरवेल

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रासह तीन राज्यात नीट परिक्षेचा गोंधळ

News Desk

राहुल गांधी यांनी कुणाला मारला डोळा…. जाणून घ्या

News Desk

नोटबंदीवरून संघाचा सरकारला घरचा आहेर

News Desk