HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्याची श्रुती श्रीखंडे ‘कंम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ परीक्षेत देशात पहिली

पुणे | केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या संयुक्त सुरक्षा सेवा (सीडीएस) परीक्षेत पुण्याची श्रुती श्रीखंडे मुलींमध्ये देशात प्रथम आली आहे. श्रुतीने आयएलएस पुणे येथून कायद्याचे शिक्षण घेतले असून ती ब्रिगेडियर विनोद श्रीखंडे यांची मुलगी आहे.

सीडीएस परीक्षेत लेखी परिक्षा आणि मुलाखत असे दोन टप्पे असतात. त्याचबरोबर शारीरिक क्षमता हा तितकाच महत्त्वाचा भाग आहे. देशभरातील फक्त २३२ विद्यार्थीच या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. या परीक्षेत मुलांमध्ये निपूर्ण दत्ता देशात पहिला आला आहे. एप्रिल २०१८पासून श्रुतीच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींचे २०२२ चे स्वप्न आम्ही २०१९ मध्येच पूर्ण करू !

Gauri Tilekar

शरद पवार हे प्रेम करावं असं नेतृत्व आहेच, राऊतांचा राज्यपालांना टोला

News Desk

“गुडघे टेकणार नाही, मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक”, ED च्या कारवाईनंतर राऊतांची प्रतिक्रिया

Aprna