HW News Marathi
देश / विदेश

रियायन्स जिओमध्ये आणखी एका अमेरिकी कंपनीची गुंतवणूक

मुंबई | रिलायन्स कंपनीने काही दिवसांपूर्वीच फेसबुक सोबत करार केला होता. जिओ प्लॅटफॉर्म्ससोबत हा एक मोठा करार करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपने आणखी एका मोठ्या कराराची घोषणा केली आहे. हा करार जिओ प्लॅटफॉर्म्स आणि अमेरिकेची खासगी इक्विटी कंपनी सिल्वर लेक यांच्यामध्ये झाला आहे.

५,६५६ कोटी रुपयांची ही गुंतवणूक सिल्वर लेक कंपनीन जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ प्लॅटफॉर्मसकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच, रिलायन्स कंपनीने तसे परिपत्रक ट्विटरवरुनही शेअर केले आहे. विशेष म्हणजे, केवळ १ टक्के हिस्सेदारीसाठी सिल्वर लेकने जिओमध्ये तब्बल ५,६५६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणूकीमुळे जिओ प्लॅटफॉर्म्सची इक्विटी व्हॅल्यू ४.६० लाख कोटी रुपये इतकी होणार आहे. तर, एंटरप्राइज व्हॅल्यू ५.१५ लाख कोटी झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

सिल्वर लेक फर्मची जगातील मोठ्या टेक्नॉलॉजी कंपन्यांसोबत भागीदारीचा शानदार रेकॉर्ड आहे. टेक्नॉलॉजी आणि फायनान्समध्ये सिल्वर लेक कंपनी लोकप्रिय आहे. त्यामूळे या कंपनीसोबत काम करण्यासाठी आम्ही उत्सूक आहोत. तसेच, भारताच्या डिजीटलायजेशनसाठी या कंनीही ही गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे, असेही मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारताकडून इतर देशांना स्वस्त दरात पेट्रोल विक्री

News Desk

शरद पवार मुख्यमंत्र्यांना शिकवणार पूरपरिस्थिती नियोजन, २० तारखेला होणार भेट..!

Gauri Tilekar

देशभरात एनआरसी लागू करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, गृहमंत्रालयाकडून लेखी उत्तर

swarit