HW News Marathi
महाराष्ट्र

सुट्टी सिगारेट विकण्यावर राज्य सरकारची बंदी

मुंबई | ‘सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायदा २००३’ नुसार सिगारेट पाकिटाच्या ८५ टक्के भागावर सिगारेट वा बिडी आरोग्याला घातक असल्याचा संदेश असावे असे बंधनाकारक करण्यात आले होते. त्यामुळे सिगारेट हे आरोग्यास धोक्याचे असल्याचा संदेश देण्यात आला होता. पण, आता अनेक पानटपऱ्यांवर सिगारेटच्या पाकिटातून एक-एक सिगारेटची आणि बिडीची विक्री केली जात आहे. याला आळा घालण्यासाठी सुट्टी सिगारेट आणि बिडी विक्रीवर बंदी आणावी असा प्रस्ताव आरोग्य विभागाने विधी व न्या विभागाकडे पाठवला होता. त्यावर अखेर सरकारने शिक्कामोर्तब केले आहे.

हा नियम बंधनकारक करण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सुद्धा आग्रह धरला होता. त्यामुळे आता सर्व कायदेशीर बाजू तपासल्यानंतर २४ सप्टेंबरपासू राज्यातील कोणत्याही पान-बिडी शॉप किंवा दुकानांवर यापुढे सुटी सिगारेट किंवा बिडी विकता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.जर सिगारेट किंवा बिडी विकत घ्यायची असेल तर यापुढे संपूर्ण पाकिटच खरेदी करावे लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज न्यायालयीन कामकाजावर राहणार बहिष्कार

Gauri Tilekar

राज्यातील ऊसतोड कामगारांना १०० कोटींचे पॅकेज जाहीर करण्याची सरकारकडे मागणी | सुरेश धस

swarit

भाजपला १० अपक्ष आमदारांचा पाठिंबा

News Desk