HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह ट्विट केलेल्या समीत ठक्करला जामीन मंजूर 

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या समीत ठक्करला जामीन मंजूर झाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने समीत ठक्करला जामीन मंजूर केला आहे. समीत ठक्करच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात जामीनासाठी सुनावणी झाली होती. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासमोर समीत ठक्करच्या याचिकेवर सुनवाणी झाली. सर्वोच्च न्यायालयानं ठक्करला मुंबईतील न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यास सांगितले होते. समीत ठक्करला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केल्यामुळे २४ ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. मुंबई सत्र न्यायालयानं समीत ठक्करची २५ हजार रुपयांच्या हमीवर मुक्तता करण्यात आली आहे.

१जुलै २०२० ला शिवसेना पदाधिकाऱ्याने समीत ठक्कर विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये समीत ठक्करनं ट्विटमध्ये उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला होता. मुंबईत समीत ठक्कर विरोधात मुंबईतील धर्मेंद्र मिश्रा यांनी व्हीपी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. बीकेसी सायबर सेलकडे देखील ठक्कर विरोधात तक्रार दाखल केली होती. भारतीय दंड विधान आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये समीत ठक्करवर गुन्हा नोंदवण्यात आला होता.

वी पी रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जुलैला ठक्कर नावाच्या व्यक्तिने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आणि त्या फोटोला संदर्भ देत आदित्य ठाकरे यांचा उल्लेख ‘महाराष्ट्राचे मोहम्मद अझम शाह आणि बेबी पेंग्विन’ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘ माॅडर्न युगातील औरंगजेब’ असा केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांनी ‘ओबीसीं’चे नेतृत्व करावे!

News Desk

भाजपची ‘वर्षा’ बंगल्यावर बैठक, युतीचा तिढा सोडविण्यासाठी हालचालींना वेग

News Desk

नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडणार!, राज्य शासनाचा निर्णय

News Desk