HW News Marathi
Covid-19

‘बार मालकांसाठी एवढा कळवळा,मराठा आरक्षणाकडेही लक्ष द्या !’ भाजपचा शरद पवारांना टोला …

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गेल्या काही दिवसांंपासून राजकीय घडामोडींपासून दूर आहेत.पवारांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाचं ते पुन्हा सक्रीय झाले आहेत.पवारांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांना एक पत्र लिहीत काही मागण्या केल्या आहेत. कोरोना परिस्थितीमध्ये अनेक व्यवसाय-धंद्यांवर परिणाम झाला आहे,त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील लोकांना फटका बसला आहे. याबाबत शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून काही मागण्या केल्या आहेत.त्यावरूनचं भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे,अशा शब्दांत पवारांना टोला लगावला आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे की, मा.शरद पवार साहेबांनी बारमालकांना वीज बिलात सवलत द्यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, याच कळकळीने आपण शेतकऱ्यांसाठीही एखादे पत्र पाठवाल अशी अपेक्षा आहे. १०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे हे मी नमूद करू इच्छितो.

तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. ‘मा. शरद पवार साहेब हॉस्पिटलमधून सकुशल आल्याबद्दल आपले अभिनंदन. प्रकृती सावरल्यावर आपण सर्वप्रथम बार मालकांसाठी आवाज उठवलात, बहुधा मराठा आरक्षणाचे वृत्त आपल्या कानावर आले नसावे. बार मालकांच्या प्रकरणातून वेळ मिळाला तर थोडं तिथेही लक्ष द्या. मराठा समाज आशेने आपल्याकडे पाहतोय’, असं ट्वीटही भातखळकर यांनी केलं आहे.

शरद पवारांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागण्या…

– एफएल- ३ परवानाधारक हॉटेल-परमिट बार मालकांना अबकारी कर किमान चार हप्त्यांमध्ये भरण्याची सवलत द्यावी.

– वीज बिलात व मालमत्ता करात सवलत मिळावी.

– केंद्रीय अर्थ मंत्रालयाने आपत्कालीन पतरेखा हमी योजना क्र. १.० व २.० अमलात आणून सदर योजनेला दि. ३० जून २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच पर्यटन-आदरातिथ्य व्यवसायांकरिता क्र. ३.० योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यात देखील उद्योग-व्यवसायाला संजिवनी देणारी, रोजगाराला प्रोत्साहन देणारी अशी योजना राबवावी.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र सरकारला घाबरायचं की त्यांच्यासोबत लढायचं ? हा निर्णय आपणच घ्यायचा !

News Desk

पुण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला,१८ जणांना लागण..महाराष्ट्रात ४२ रूग्ण

Arati More

राज्याची चिंता अधिकच वाढली ! आज नव्या कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांजवळ

News Desk