HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

…तर पुढील अनेक वर्ष चांगल्या कामासाठी आम्हाला शुभेच्छा द्याव्या लागतील ! | धनंजय मुंडे

बीड | “बीड जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री यांनी दिलेल्या शुभेच्छा घेऊन जिल्ह्यात येत्या ४ वर्षात विकासाचे असे काम करू की पुढील अनेक वर्ष त्यांना आम्हाला शुभेच्छा द्याव्या लागतील”, असे विधान बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. संत वामनभाऊ महाराज यांच्या ४५व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथे आयोजित कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते.

“गेल्या सरकारच्या काळात ‘ब’ दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या गहिनीनाथगडास मागील सरकारच्या काळात विविध विकास कामांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली होती परंतु प्रत्यक्षात फक्त दोन कोटी रुपये प्राप्त असल्याची कबुली माजी आमदार भीमराव धोंडे यांनी दिली. रखडलेले २३ कोटी रुपये व अधिकचे ५ कोटी रुपये निधी राज्य सरकारच्या माध्यमातून या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी येत्या दोन वर्षात उपलब्ध करून देऊ” असा शब्दही यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

मंत्री धनंजय मुंडे यांनी पुढे बोलताना, “ऊसतोड मजुरांचा जिल्हा ही ओळख पुसून टाकून सर्वाधिक ऊस पिकवणारा जिल्हा अशी ओळख निर्माण करून देणे आणि जिल्ह्याची मागासलेपण दूर करणे हा आपला निर्धार आहे”, असेही बोलून दाखवले.

Related posts

सेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना अर्थ नाही – पंकजा मुंडे

News Desk

आरोग्य विभागाच्या घोटाळ्याच्या प्रश्नावर राजेश टोपेंनी फडणवीसांना दिले उत्तर !

News Desk

#MarathaReservation : मराठा आरक्षणावरून श्रेयवादाची लढाई ?

News Desk