HW News Marathi
महाराष्ट्र

‘कधी कधी लोकांना फार विनोद करण्याची मध्येच हुक्की येते’ – छगन भुजबळ

नाशिक। वेळ आली तर शिवसेनाभवन फोडू म्हणणाऱ्या भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर शिवसैनिक तुटून पडले आहेत. राज्यभरातले शिवसेना नेते-पदाधिकारी लाड यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना प्रत्युत्तर देत आहेत. दुसरीकडे जुने जाणते शिवसैनिक, मंत्री छगन भुजबळ (यांना याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांच्यातलाही शिवसैनिक जागा झाला. त्यांनीही फक्त एका वाक्यात उत्तर देत प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर हसत मिश्किलपणे उत्तर दिल आहे.

लोकांना विनोद करण्याची हुक्की येते!

नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी आवर्जून भुजबळांना प्रसाद यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला. भुजबळांनी मात्र आक्रमक उत्तर देणं टाळत हसत हसत उत्तर दिलं. ‘कधी कधी लोकांना फार विनोद करण्याची मध्येच हुक्की येते’, असं हसत हसत भुजबळ म्हणाले. एकंदरित लाड यांचं वक्तव्य भुजबळांनी फार गांभीर्याने घेतलं नाही. प्रसाद लाड यांना अनुल्लेखाने मारण्याचा भुजबळांनी प्रयत्न केला.

केवळ तीन शब्दात प्रसाद लाड यांची इज्जत

शिवसेनेचे नेते संजय राऊत प्रसाद लाड यांच्यावर काय बोलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मात्र जास्त काहीही न बोलता संजय राऊतांनी या प्रकरणावर ‘आमचे शाखाप्रमुख बोलतील’, असं म्हणत केवळ तीन शब्दात प्रसाद लाड यांची इज्जत काढली.

वेळ आली तर शिवसेना भवन फोडू, असं चिथावणीखोर वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर कालपासून संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसेना नेते-कार्यकर्ते-पदाधिकारी लाड यांचा निषेध व्यक्त करत जशास तसं प्रत्युत्तर देत आहेत. आज सकाळी राऊतांना पत्रकार परिषदेत याचविषयी विचारलं असता, त्यांनी प्रसाद लाड यांना महत्त्व न देता उत्तर दिल आहे.

वेळ आली तर सेना भवन फोडू असं प्रसाद लाड म्हणाले, आपण काय म्हणाल?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर संजय राऊत यांनी ‘आमचे शाखाप्रमुख बोलतील’ एवढ्याच तीन शब्दात लाड यांची इज्जत काढली.

नेमका काय प्रकार घडला?

भाजपच्या दादर येथील कार्यालयाचं उद्घाटन आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. प्रसाद लाड यांनी यावेळी वेळ आली तर सेनाभवन फोडू असं चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. माध्यमात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर प्रसाद लाड यांच्यावर सेना-नेते-कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांनी शाब्दिक हल्ला चढवला. ज्यानंतर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा लाड यांनी केला.

प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले होते?

नारायण राणे आणि राणे कुटुंबीयांना मानणारा देखील स्वाभिमानचा एक खूप मोठा गट आज राणे साहेबांच्या निमित्तानं, नितेशजींच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीमध्ये आलाय. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चितपणे डबल झाली आहे. त्यामुळे नितेशजी पुढच्या वेळेस कार्यकर्ते कमी आणुयात, कारण आपण आलो की पोलिसच खूप येतात. फक्त त्यांना सांगुयात की ड्रेसमध्ये पाठवू नका म्हणजे त्यांना हॉलमध्ये बसता येईल. “तुमची आमची ह्यांना एवढी भीती वाटते की आपण माहिमध्ये आलो तरी ह्यांना वाटतं की हे सेनाभवन फोडणार आहेत. काय घाबरू नका वेळ आली तर ते देखील करुयात, असं प्रसाद लाड म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

DBT पद्धतीने बांधकाम कामगारांच्या बॅंकेत प्रत्येकी २ हजार रुपये जमा होणार

News Desk

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ ट्विटरवर झाले ‘लखपती’

News Desk

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी अखेर तिच्या आई वडिलांनी दिले स्पष्टीकरण

Manasi Devkar