HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

महाविकासआघाडीच्या खातेवाटपाचा मुहूर्त लांबणीवर

मुंबई | काँग्रेस नेते दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या भेटी गेले होते. यानंतर काँग्रेस नेते आज (३ डिसेंबर) सायंकाळी मुंबई दाखल होणार आहे. त्यामुळे महाविकासआघाडीचे खाते वाटप आज होणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात महाविकासआघाडीचे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहे. मात्र, महाविकासआघाडीच्या बैठकीनंतर खातेवाटपबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झाला नाही. यामुळे महाविकासआघाडीच्या खातेवाटपाचा मुहूर्त लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जाते.

मंत्रिमंडळाच्या विस्तरासोबतच कोणत्या नेत्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या आम्ही सातही लोक एकत्रितपणे काम करत आहोत. त्यामुळे कोणीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. अजूनही खातेवाटप झाले नाही मग काय? असे काहीही नाही. आम्ही सध्या सर्व खाती एकत्रितपणे हाताळत आहोत. खातेवाटपाचा निर्णय आम्ही पुढील दोन तीन दिवसांत घेऊ, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

 

 

Related posts

माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे निधन

News Desk

मिलिंद एकबोटे यांना गोरक्षकांकडून मारहाण

News Desk

पंतप्रधानांची मुलाखत म्हटल्यावर इतकी तर वाजणारच !

News Desk