HW News Marathi
महाराष्ट्र

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : पराभवानंतर पवार-शिंदेमध्ये बंद दाराआड चर्चा

सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. यामुळे शिंदेंना पराभवाचा मोठा धक्का बसला होता. या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार श्रीनिवास पाटील आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर शिंदे हे येत्या २५ नोव्हेंबरला पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा असल्याची शक्यात वर्तवली जात आहे. उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत मी सातारा जिल्हा बँक निवडणुकीबाबत आणि भविष्यातील राजकीय वाटचाल संदर्भात बोलणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

बँक निवडणुकीत कुठे विजयी- पराभव

शिंदेंचा जावळी सोसायटी गटातून अवघ्या एका मताने पराभव झाला. शिंदेच्याविरोधात ज्ञानदेव रांजणे हे विजयी झाले. तर पाटण विकास सेवा सोसायटी गटातून सत्यजीत विक्रमसिंह पाटणकर विजयी झाले. दरम्यान, शिवसेनेचे उमेदवार आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनाही पराभवाचा धक्का बसला. तसेच कराड सोसायटी गटामधून सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचा विजयी झाला असून विलासकाका उंडाळकर यांचे काँग्रेसवासी पुत्र उदयसिंह उंडाळकर यांचा पराभव केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात ‘शेत तेथे मत्स्यतळे’ योजना राबविणार! – सुधीर मुनगंटीवार

Aprna

राज्यात अतिवृष्टीमुळे १७ लाख हेक्टर जमिनींचं नुकसान, ८१ टक्के पंचनामे पूर्ण विजय वडेट्टीवार यांची माहिती!

News Desk

केंद्राची जबाबदारी नाकारून भाजपने दिशाभूल करू नये: अशोक चव्हाण

News Desk