HW News Marathi
महाराष्ट्र

एसटी कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर

मुंबई | एसटी महामंडाळाचे कर्मचारी वेतन वाढीसाठी गुरुवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. सराकरने कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी संदर्भात मान्यता प्राप्त संघटनेशी चर्चा न करता निर्णय घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी आणि एसटी महामंडळाचे खासगीकर थांबण्यात यावे, अशा विविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर गेले आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षी देखली वेतनवाढीसाठी संप पुकारला होता. तेव्हा कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढ करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु हे आश्वासन देऊन ही एक वर्ष उलटून गेले असून देखली कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ झाली नाही. सध्या कर्मचाऱ्यांना १३ हजार ७७० रुपये पगार आहे.

महाराष्ट्रच्या तुलनेत आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना १९ हजार रुपये इतका पगार मिळतो. संपाची कोणतीही नोटिस न देता गुरुवारी मध्यरात्रीपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय कामगारांनी घेतल्यामुळे सरकारने एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली तरी चालेल, अशी माहिती कामगार संघटनेच्या नेत्यांनी दिली आहे.

 

 

संबंधित बातम्या | एसटी महामंडळाच्या तिकीटात १५ जूनपासून १८ टक्के वाढ

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद

News Desk

कोणाचेही वेतन कापले जाणार नाही, कर्मचाऱ्यांच्या पगाराची दोन टप्प्यात विभागणी होणार !

swarit

“मुन्नाभाई सुपरहिट झाला तर तुम्ही फ्लॉप होणार,” नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

Aprna