HW News Marathi
महाराष्ट्र

“ST कर्मचाऱ्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून आपलं नुकसान करून घेऊ नये!” परबांची विनंती

मुंबई | “एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना भडकल्या असलेल्या तरीही त्यांनी चुकीचे कोणतेही पाऊल उचलू नका,” अशी विनंत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. “राजकीय पोळी भाजा पण पोळी जळू नये, यांची काळजी घ्या, असे सूचक विधान करत परबांनी भाजप नेते गोपीचंद पडळीकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. परबांनी आज (२० नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना सांगितले.

परब म्हणालं, “सरकारने कुठेही आडमुठेपणाची भूमिका घेतलेली नाही. सरकारनं नेहमी सहनभूतीची भूमिका घेतली आहे. विलीनीकरणाची प्रक्रिया १-२ दिवसात होणार नाही. तर एसटीच्या विलीनीकरणाचा मुद्दा हा कमिटिच्या माध्यामातून येईल, तेव्हाच योग्य तो निर्णय घेतला जाईल.” एसटी कर्मचारी आज आक्रमक पवित्रा घेतल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना परब म्हणालं, “एसटी कर्मचारी संप करण्याचा अधिकार आहे. आपल्या हक्कासाठी लढण्याचा देखील त्यांना अधिकार आहे.” त्यामुळे त्यांना योग्य वाटते, ते करू शकतात. कोणाच्या सांगण्यावरू किंवा भडकवल्यावरून एसटी कर्मचाऱ्यांनी कोणतीही कृती करू नये,” अशी विनंती परबांनी कर्मचाऱ्यांना माध्यमांतून केली आहे. “कारण जे नेते भडकवित आहे. यात तुमचे नुकसान झाले तर यापैकी कोणतंही नेते त्यांना विचारायला येणार नाही. याआंदोलनाला राजकीय रंग देण्याचा कोणाचाही उदेश नाही. परंतु राजकारण करण्यासाठी जे भडकवतात, कर्मचाऱ्यांना उसवितात.”

राजकीय पोळी भाजा पण पोळी जळू नये, यांची काळजी घ्या !

एसटी कर्मचाऱ्यांना तुमचे न्याय मागण्याचा अधिकार तुम्हाला आहे. परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरून आपले नुकसान करून घेऊ नका, अशी विनंतर परबांनी कर्मचाऱ्यांना केली आहे. मी कार्मचाऱ्यांशी कोणत्याही प्रकारचा लढा देऊ इच्छित नाही, कारण ते शेवटी माझेच कामगार आहे. कदाचित त्यांच्या भावना भडकल्या असतील. परंतु भावना भडकल्या असलेल्या असतील तरी देखील चुकीचे कोणतेही पाऊल उचलू नका, अशी विनंत परबांनी केली आहे. राजकीय पोळी भाजा पण पोळी जळू नये, यांची काळजी घ्या, असे सूचक विधान करत परबांनी भाजप नेते गोपीचंद पडळीकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकासआघाडीतील पक्षांनी एकमेकांची काळजी घेतली पाहिजे !

News Desk

राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली ‘ही’ महत्त्वाची बाब !

News Desk

राष्ट्रपती निवडणूक – २०२२ साठी जय्यत तयारी; निवडणूक पूर्वतयारीसाठी उच्चस्तरीय समितीची बैठक

Aprna