HW News Marathi
महाराष्ट्र

पेट्रोल-डिझेलनंतर आता एसटीची भाडेवाढ?

मुंबई | लवकरच एसटी महामंडळ देखील आपल्या तिकिटांच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे. कोरोना काळात अचानक एसटी महामंडळाचे उत्पन्न घटले. त्यामुळे महामंडळाला तब्बल 12 हजार 500 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.मागील काही दिवसांत सातत्याने वाढत जाणाऱ्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतींमुळे सर्वसामान्य माणूस हैराण असताना आता त्यामध्ये आणखी एका दरवाढीची भर पडण्याची शक्यता आहे.

टायरचे दर, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि सुटे भागांच्या दरात देखील वाढ

लवकरच एसटी महामंडळ देखील आपल्या तिकिटांच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे. कोरोना काळात अचानक एसटी महामंडळाचे उत्पन्न घटले. त्यामुळे महामंडळाला आज अखेर तब्बल 12 हजार 500 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यातच पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सातत्याने होत आहे. दुसरीकडे टायरचे दर, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि सुटे भागांच्या दरात देखील वाढ झाली आहे. त्यामुळे महामंडळाने तिकिटांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य परिवहन प्राधिकरणामध्ये परिवहन आयुक्त, परिवहन विभागाचे सचिव आणि अर्थ खात्याचे सचिव यांचा समावेश आहे. सोमवारी या प्राधिकरणातील अधिकाऱ्यांची बैठक होईल आणि त्यानंतरच नेमकी किती दरवाढ एसटी महामंडळ करणार आहे याबाबतची माहिती समोर येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींचा बायोपीक प्रदर्शित होणे आणि विवेक ओबेरॉयच्या घरी रेड पडणे हा नियतीचा खेळः सचिन सावंत

News Desk

जलयुक्त शिवार योजनेची चौकशी सुरू असताना क्लीन चिटचा प्रश्नच नाही – राज्य सरकार

News Desk

गणेशोत्सवासाठी साकारलं गिरणगाव!

News Desk