HW News Marathi
महाराष्ट्र

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर ?

मुंबई | राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार १४ जून म्हणेजच उद्या (शुक्रवार) होणार असल्याची माहिती मिळत होती. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजप-शिवसेनेत सध्या धुसफूस सुरु आहे. त्यामुळे, हा मंत्रिमंडळ आता लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे यंदाची विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत आहे. तसा आग्रहच पक्षाच्या आमदारांकडून केला जात आहे.

भाजपकडून शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद किंवा दोन मंत्रीपदांची ऑफर देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीर शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री पदासाठी सुभाष देसाईं यांचे नाव पुढे येताना दिसत असले तरीही शिवसेनेतील अनेक नेत्यांचा त्यांच्या नावाला पाठिंबा नसल्याचे समजत आहे. दरम्यान, दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी यंदाची विधानसभा लढवावी, अशी इच्छा युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत असली तरी आज (१३ जून) ‘मातोश्री’वर झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढविण्याबाबतच्या प्रश्न उत्तर देणे टाळले आहे.

आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी मतदारसंघातून विधानसभा लढतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. काहीच दिवसांपूर्वी युवासेनेचे सरचिटणीस आणि आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ वरुण सरदेसाई यांनी इन्स्टाग्रामवर टाकलेल्या एका पोस्ट्समुळे या चर्चांना उधाण आले होते. “हीच वेळ आहे, हीच संधी. लक्ष्य विधानसभा २०१९. महाराष्ट्र वाट पाहतोय”, असा मजकूर लिहीत वरुण सरदेसाई यांनी आपल्या इंस्टाग्रामवर आदित्य ठाकरे यांना मिठी मारत असल्याचा एक फोटो शेअर केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ.हंसराज वैद्य यांना फेस्कॉमचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार प्रदान 

News Desk

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून ५जणांचा मृत्यू तर ५ जखमी; पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Aprna

 सेवानिवृत्त पोलीस संघटनेचा कोल्हापूर येथे मेळावा

News Desk