HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी MPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे आपले लक्ष वेधावे! – गोपीचंद पडळकर

 मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत सुधारली आहे. आणि ते आता सक्रीय झाले, हे ऐकून मला आनंद झाला. म्हणूनच मी आज जवळपास साडे तीन हजार एमपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आपले लक्ष वेधतोय, असे भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. पडळकर पुढे म्हणाले, संयुक्त पूर्वपरिक्षा २०२० मध्ये झालेला गोंधळ समोर आला आहे. नुकतेच उच्च न्यायालयाने ८६ विद्यार्थ्यांना मुख्य परिक्षेला बसण्याची परवानगी दिली.

पण, उर्वरित विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे उच्च न्यायालयाचा दरवाचा ठोठावू शकले नाही. मग त्यांना न्याय मिळणार नाही का? त्यामुळेच त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला, अशा विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकारने त्वरीत विचार करावा. मला सरकारला हे सांगायचे की, एमपीएससीने प्रश्नपत्रिका व उत्तर तालिकेत गोंधळ घातला आहे. हे उच्च न्यायलयात सिद्ध झाले आहे. याची दखल घेत राज्य सरकारने एमपीएससीला संपूर्ण विद्यार्थ्यांची जबाबदारी घेऊन त्वरित कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा यात एखाद्याने स्वप्नील लोणकर सारखे पाऊल उचलले तर याची सर्वस्वी चे जबाबदारी राज्य सरकारची असेल, असे पडळकर म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…..आणि राज ठाकरे म्हणाले, ऐ चल बस्स…”!

News Desk

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंची आज ईडी चौकशी होणार

News Desk

औरंगाबादमध्ये २ नवे कोरोना पॉझिटिव्ह, शहराची संख्या २० वर

News Desk